आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सुंदर दिसण्यासाठी महिला नेहमीच काहीतरी उपाय करत असतात. बाजारात उपलब्ध विविध प्रॉडक्टचाही त्या वापर करतात. मात्र, नैसर्गिक सौंदर्य हवे असेल तर रात्री झोपण्यापूर्वी काही खास उपाय केल्यास तुमचे सौंदर्य उजळू शकते. हे उपाय कोणते, याविषयी माहिती घेवूयात.
१) कच्चे दूध
यामुळे डेड स्किन निघून जाते. त्वचेचा ग्लो वाढतो.
२) ऐलोवेरा जेल
हे कापसाने लावल्याने चेहर उजळतो, कोरडेपणा दूर होतो.
३) गुलाबजल
त्वचेवर लावल्याने ती कोमल होते.
४) अद्रकचा रस
यामुळे चेहरा गोरा होतो. चमक वाढते.
५) खोबरेल तेल
याने हलक्या हताने मालिश केल्याने सुरकुत्या दूर होतात.
६) मध
यात लेमन ज्यूस मिसळून लावल्याने चेहरा उजळतो. डाग दूर होतात.
७) ग्रीन टी
कापसाने हे लावल्याने त्वचेची चमक वाढते.
८) बेसन
बेसनमध्ये दही मिसळून लावल्याने ब्लॅकहेड्स निघून जातात.
९) काकडीचा रस
यामध्ये लेमन ज्यूस मिसळून लावल्याने सुरकुत्या दूर होतात. त्वचा मऊ होते.
१०) ऑलिव्ह ऑइल
हे लावून हलकी मालिश केल्याने त्वचा मुलायम होते.