आरोग्यानामा ऑनलाईन टीम : आपल्या अनेक पारंपरिक पाककृती काळाच्या ओघात विस्मृतीत जाऊ लागल्या आहेत. त्यापैकीच एक अंबील होय. उष्ण हवामानात अंबील हा एक आदर्श आहार आहे. ज्वारी, बाजरी किंवा नाचणीपासून अंबील तयार केले जाते. हे एक घट्टसर पेय असून यामुळे भूक आणि तहान दोन्ही शमते. महाराष्ट्रात तसेच कर्नाटकमध्ये अंबीलचे सेवन केले जाते.
असे तयार करा
साहित्य : हवामानानुसार ज्वारी, बाजरी किंवा नाचणीचे एक मध्यम वाटी पीठ, आंबट ताक साधारण पिठाच्या दुप्पट, आले, हवे असल्यास लसूण, हिरवी मिरची, फोडणीसाठी जिरे, हिंग, मीठ, साखर आणि कोथिंबीर.
कृती : कढईत तूप तापवून त्यात जिरे आणि हिंग घाला. नंतर लसूण मिरची आले हे सर्व बारीक चिरून घाला. हे सर्व साहित्य किंचित परतून त्यात पीठ घाला. चांगले परतून त्यात पाणी घालून भरभर ढवळून घट्ट शिजवून घ्या. शिजवताना पिठाची कच्ची चव गेली पाहिजे. शिजवलेले पीठ थंड करून त्यात ताक, मीठ, साखर आणि कोथिंबीर घालून साधारण पातळ करून घ्या. आवडीनुसार मिरची, लसूण यांचे प्रमाण ठरवा.
हे आहेत फायदे
१ अंबील पोटाला थंड असते.
२ पित्ताच्या त्रासावर गुणकारी आहे.
Visit : arogyanama.com