आरोग्यनामा ऑनलाईन टीम – स्तनपान करणाऱ्या महिलांना स्वतःच्या आहाराबाबत स्वतःच्या खूप सतर्क राहावे लागते. कारण त्यांना त्यांच्या बाळाची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे त्यांना डॉक्टर काही मोजके म्हणजे बाळाच्या आरोग्याला सहन होतील असे पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांना दूध कमी येत असेल तर त्यांनी खालील हेल्थ ड्रिंक्स घ्यावेत.
१) आलं हे दूध वाढवण्यास फायदेशीर ठरते. आलं स्तनपान करणार्या स्त्रियांच्या आरोग्यात फायदेशीर आहे. या दिवसांमध्ये पचनाचा त्रास, मळमळ कमी करण्यास, शरीरात रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. दिवसाला १-३ कप चहा पिणं पुरेसे आहे.
२) बदामामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, डी, ई घटक मुबलक असतात. त्यामुळे हे दूध येण्यासाठी उपयुक्त आहे.
३) दूध वाढण्यासाठी फळं नैसर्गिक स्वरूपात आणि चावून खाणंच आरोग्यदायी आहे. मात्र काही फळांचा तुम्ही घरच्या घरी रस काढू शकता.
४) मेथी दूध वाढवायला मदत करते. आहारात मेथीचा काढा. भाजी किंवा लाडवाच्या स्वरूपात समावेश केला जाऊ शकतो. दिवसाला 2-3 कप मेथीचा काढा पुरेसा आहे.