आजारांपासून मुक्‍ती मिळविण्‍यासाठी पूजाविधीतील ‘या’ वनस्‍पती आहेत प्रभावी ; जाणून घ्या

आजारांपासून मुक्‍ती मिळविण्‍यासाठी पूजाविधीतील ‘या’ वनस्‍पती आहेत प्रभावी ; जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अशा अनेक वनस्पती आहेत, ज्यांचा वापर आपण पूजाविधीमध्ये नियमित करत असतो. मात्र, त्यांच्यातील औषधी गुणधर्माविषयी आपल्याला माहिती नसते. काही आदिवासी लोक अशा वनस्तींचा वापर रोजच्‍या आहारातही करतात. त्‍यामुळे त्‍यांचे आजारी पडण्‍याचे प्रमाण खूप कमी असते. अशाच काही वनस्‍पती आणि त्यापासून कोणते आजार बरे होतात, याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

वनस्पती आणि उपाय

दुर्वाचे रोज सेवन केले तर शरीरामध्‍ये चेतना निर्माण होते. थकवा येत नाही. नाकातून रक्त येत असेल तर दुर्वाचे दोन थेंब नाकात टाकल्‍यानंरत रक्‍तस्‍त्राव होत नाही.

मदार या वनस्‍पतीला रुई या नावाने ओळखले जाते. मदारचे दूध जखमेवर लावल्‍यानंतर जखम लवकर बरी होते.

मका आहारात घेतल्यास शरीराला शक्‍ती आणि ऊर्जा मिळते. मकाचा रस प्‍यायल्‍यानंतर कावीळ आजार लवकर बरा होतो.

वजन कमी करण्‍यासाठी आघाडा या वनस्‍पतीचा उपयोग होतो. या वनस्‍पतीच्‍या मुळ्या रोज चावल्‍यातर दात मजबुत होतात.

 ताप आला असेल तर कनेरी ही वनस्पती प्रभावी ठरते. विंचू किंवा साप चावल्‍यानंतर औषध म्‍हणून कनेरीचा वापर करतात.

सुक्ष्‍मजीव संक्रमणासाठी तुळस ही औषधी वनस्‍पती आहे. सर्दी, खोकला, पडसे या आजारावर तुळस प्रभीव आहे.

महिलांना मासिक धर्मा संबंधीत आजार असल्यास केवडा हा रामबाण उपाय आहे.

 शरीरातील उष्‍णता कमी करण्‍यासाठी शमी वनस्‍पतीचा उपयोग केला जातो. वारंवार लघवीचा त्रास असल्यास या वनस्‍पतीचे पानाचे सेवन करावे.

 बेलाचे पान शरीरातील दुर्गंध कमी करते.

१० हृदयाच्‍या विकारासाठी अर्जुन वृक्षाची पाने सर्वोत्तम आहेत. वजन कमी करण्‍यासाठी हे उपयोगी आहे.

११ स्‍मृरणशक्‍ती वाढवण्‍यासाठी, लहान मुलांच्‍या पोटाच्‍या आजारासाठी पींपळ गुणकारी औषध आहे.

१२ गर्भाशय निरोगी ठेवण्‍यासाठी, मासिक धर्मा संबंधीत आजारावर प्रभावी उपाय म्‍हणून अशोक चा वापर केला जातो.

१३ जास्वंदीच्या फुलाचा रस प्‍यायलानंतर मानसीक ताण कमी होतो. शांत झोप लागते.

१४  गर्भधारणेसाठी या वनस्‍पतीचा वापर केला जातो. शिवलिंगी वनस्‍पतीच्‍या बिया गर्भधारणेसाठी प्रभावी ठरतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु