‘दीर्घायुषी’ होण्याचा मार्ग सापडला, जगा ‘असे’ आयुष्य

‘दीर्घायुषी’ होण्याचा मार्ग सापडला, जगा ‘असे’ आयुष्य
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आयुष्यात कितीही दुःख आले तरीही प्रत्येकाला आपण खूप जगावं असचं  वाटत. पण दीर्घायुषी होण्याचे रहस्य हे आरोग्याशी नाही तर मनाशी जोडलेले आहे. लहानपणापासून आपण समाजाने घातलेल्या नियमांच्या चौकटीत जगतो .रोजची धावपळ आपण करतो ते भविष्य घडवण्यासाठी आणि नेहमी भविष्याच्या भीतीने वर्तमान देखील खराब  करतो.

रोज नोकरी, घर , स्वयंपाक, मुलं अशा आपण दिनक्रमात हरवून जातो. आपल्याला काय आवडत ? आपले छंद काय हे देखील आपल्या लक्षात नसते.  शिक्षण , नोकरी , लग्न , संतती आणि मृत्यू यात आयुष्य कुठे हे मात्र शोधतच राहतो . म्हणूनच प्रत्येकाला दीर्घायुषी व्हावं अस वाटत.  दीर्घायुषी होण्यासाठी काय करायला हवं  हे आज आपण पाहणार आहोत .

या मार्गाने आयुष्य जगा आणि व्हा दीर्घायुषी 

१. दिवसातून काही वेळ एकटे राहा. स्वतःशी बोला , आत्मचिंतन करा.

२. शाळा ,महाविद्यालयीन आयुष्यातील वह्या पुस्तके चाळा, त्यातून तुमच्या जुन्या आठवणी आणि तुमचे छंद पुन्हा सापडतील . या छंदांना आठवड्यातून किमान
एकदा थोडा वेळ द्या.

३. रोज ८ तास झोप घ्या. लवकर उठून किमान ३० मिनिट  व्यायाम करा. मोकळ्या हवेत फिरायला जा. स्वच्छ सूर्यप्रकाशात बसा.

४. जोडीदाराशी प्रेमळ संवाद साधा, वादाचे विषय काढूच नका. चुका विसरून स्वभाव आहे तसा समजून घ्या . एकमेकांचे कौतुक करा त्यातून स्नेहबंध वाढतो. जोडीदाराशी मानसिक नातं आणि सेक्स लाईफ परिपूर्ण असणे देखील आयुष्यातले मोठे सुख आहे.

५. कामातला तोच तोचपणा नैराश्य आणतो. त्यामुळे घरातील कामामध्ये कधीतरी मदत करा. अगदी सोपी आणि आवडतील अशी कामे केली तरी चालतील. पुरुषाने घरातील कामे करू नये आणि स्त्रीने चूल आणि मूल सांभाळावे हा या समाजाने घातलेला नियम मोडीत काढा. घरासाठीच पुरुष कमावतो आणि स्त्री त्या वास्तूला घर बनवते त्यामुळे कामांमध्ये बदल केल्याने पुरुषार्थ कमी होतो किंवा स्त्री मॉडर्न होते ही मानसिकता बदला.

६. अगदी पृथ्वीवर मानवी आयुष्य सुरु झाले तेव्हा पासून सौंदर्य  खुलवणे हे स्त्रियांना आवडते . त्यात आता पुरुषही मागे नाहीत. स्वतःच्या सौंदर्याला वेळ द्या. पार्लरला जाणे आणि खरेदी करणे हे जरी नेहमी जमत नसेल  तरी घरगुती उपायांनी सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करा. नेहमीची हेअर स्टाईल , कपड्यांची पद्धत यात वेळोवेळी बदल करा.

७. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करणे देखील दीर्घायुषी होण्याचा मार्ग आहे .आपले काम एन्जॉय करता आले पाहिजे.

८. घरातली सेटिंग देखील बदल करत राहा.

९ . मित्र परिवाराशी मनसोक्त गप्पा मारा.

१०. दरवर्षी एखादी मोठी सुट्टी घेऊन फिरायला जा. निसर्गसानिध्यात वेळ घालवा. दर महिन्याला जवळ का होईना फिरायला जा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु