शरीरासाठी घातक ठरते अशाप्रकारे परिधान केलेली ‘ब्रा’, आजारांना देते निमंत्रण

शरीरासाठी घातक ठरते अशाप्रकारे परिधान केलेली ‘ब्रा’, आजारांना देते निमंत्रण

आरोग्यनामा ऑनलाइन – चांगली फिटिंग असलेली ब्रा महिलांनी नेहमी परिधान केली पाहिजे. अन्यथा अनेक प्रकारचे त्रास त्यांना होऊ शकतात. यासाठी ब्रा खरेदी करताना ब्राच्या साइझकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा छाती, पाठ आणि मानेशी संबंधित गंभीर आजार होऊ शकतात. ब्रा खुपच फिट असेल तर खांदे, हात किंवा मानेशी संबंधित आजार होऊ शकतात. योग्य फिटिंग नसलेल्या ब्रा परिधान केल्यास कोणता त्रास होऊ शकतो, याविषयी सविस्तर माहिती घेवूयात.

हे आजार होऊ शकतात

योग्य फिटिंग नसलेली ब्रा परिधान केल्यास ब्रेस्टला सपोर्ट मिळत नाही. यामुळे मान आणि पाठीवर दाब पडतो. यामुळे डोक्याकडून मानेकडे जाणारा रक्तप्रवाह बाधित होऊन डोकेदुखी होऊ शकते.

अनेकवेळा खराब फिटिंगची ब्रा परिधान केल्याने बरगड्यांवर दाब पडतो. छातीच्या या भागावर दबाव पडल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

चुकीच्या साइझची ब्रा परिधान केल्यास पोट खराब होऊ शकते. फिट ब्रा परिधान केल्याने डायफ्रमवर दबाव पडतो आणि यामुळे पचनक्रिया बिघडते.

ब्रा ब्रेस्टला सपोर्ट करते. जास्त फिट ब्रा परिधान केल्यास छातीमध्ये रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. यामुळे छातीशी संबंधित आजार होऊ शकतात.

फिट ब्रा परिधान केल्यास रॅशेज होतात. यामुळे खाज किंवा जळजळ होऊ शकते. दीर्घकाळापर्यंत अशाप्रकारची ब्रा परिधान केल्यामुळे रॅशेज फंगल इन्फेक्शनमध्ये रुपांतरीत होतात.

तसेच बसण्याची पद्धत बदलते. चुकीची ब्रा परिधान केल्याने बसताना मान झुकली जाते आणि यामुळे विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात.

हात किंवा खांद्यामध्ये बारीक सुई टोचल्याप्रमाणे वेदना झाल्यास ही समस्या गंभीर असू शकते. चुकीच्या साइझची ब्रा परिधान केल्याने असे होते. छातीशी संबंधित विविध आजार यामुळे होतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु