सौंदर्य वाढीसाठी ओटमीलचे खास ९ फेसमास्क, कोरडी त्वचा होते मॉइश्चराइज ; जाणून घ्या

सौंदर्य वाढीसाठी ओटमीलचे खास ९ फेसमास्क, कोरडी त्वचा होते मॉइश्चराइज ; जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ओटमीलमध्ये अनेक पोषकतत्त्व असल्याने सकाळी नाष्ट्यात ओटमील खाणे हा पौष्टिक आहार आहे. यामुळे वजन कमी होते. ओटमील आरोग्यासाठी चांगले आहे, तसेच सौंदर्यवृद्धीसाठी सुद्धा लाभदायक आहे. ओटमीलचे काही खास फेसमास्क तुमचे सौंदर्य वाढवू शकतात.

हे आहेत फेसमास्क

एक चमचा शिवजलेल्या ओटमीलमध्ये एक चमचा बदाम तेल मिक्स करा. हे मास्क लावा आणि सुकू द्या. यानंतर हे पाण्याने धुवून घ्या. स्किन मॉइश्चराइज होईल. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा लावा.

केळी मॅश करुन यामध्ये एक टी स्पून ओटमील आणि तीन टी स्पून गुलाबजल मिसळा. हे वीस मिनिटे लावा. यानंतर चेहरा धुवून टोनर लावा. क्लिन स्किनसाठी महिन्यातून एकदा हे मास्क लावा.

दूधामध्ये ओट्स उकळा, हे थंड झाल्यानंतर लावा. पंधरा मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. ऑइली स्किनसाठी हे फायदेशीर असते.

एक चमचा शिजवलेले ओट्स आणि दोन चमचे मध मिसळून हलक्या हाताने गालांवर लावा. हे दहा मिनिटे असेच ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. यामुळे कोरडेपणा दूर होतो. आठवड्यातून एकदा लावा.

एक चमचा शिजवलेल्या ओट्समध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि तीन चमचे पाणी मिसळा. हे लावल्यानंतर दहा मिनिटांनंतर चेहरा धुवून घ्या. स्किन टोनर लावा. डार्क स्पॉट दूर करण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा हे मास्क लावा.

शिजवलेले ओट्स आणि दोन चमचे दही मिसळून पेस्ट तयार करा. हे दहा मिनिटे लावा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. हे आठवड्यातून एकदा लावावे. यामुळे चेहरा मुलायम आणि गोरा होतो.

हे पॅक बनवण्यासाठी दोन चमचे ओटमीलमध्ये १ चमचा मध आणि गुलाबजल मिसळा. यानंतर हे लावून पंधरा मिनिटांनंतर धुवून घ्या. यामुळे तात्काळ ग्लो येतो.

हे पॅक लावल्याने चेहरा स्मूथ आणि गोरा बनतो. ओट्स, लिंबू आणि बदाम मिसळून पेस्ट बनवा आणि लावा. हे सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.

ओटमील, ऑलिव्ह ऑइल आणि लिंबूचा रस हे एक-एक टिस्पून घ्या. सर्व मिक्स करुन घ्या. चेहरा आणि मानेवर लावा. हे दहा मिनिटे लावून ठेवा. यानंतर चेहरा धुवून घ्या. हे मास्क आठवड्यातून दोन वेळा लावा. यामुळे ब्लॅकहेड्स स्वच्छ होतात आणि चेहरा चमकतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु