शांत आणि पूर्ण झोप हवी असेल तर ‘या’ ५ गोष्टी नेहमी टाळा, जाणून घ्या

शांत आणि पूर्ण झोप हवी असेल तर ‘या’ ५ गोष्टी नेहमी टाळा, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार, कामाचा ताण, वाईट सवयी, इत्यादी कारणामुळे अनेक लोकांना झोपेची समस्या भेडसावते. पैसा असूनही अनेकांना शांत झोप लागत नाही. पूर्ण आणि शांत झोप हवी असेल तर काही सवयी दूर केल्या पाहिजेत. या सवयी कोणत्या ते जाणून घेवूयात.

या सवयी सोडा

चहा-कॉफी
झोपण्यापूर्वी जर चहा-कॉफी घेतल्यास झोप उडते. पचन क्रिया बिघडते. सकाळी पोट साफ होत नाही. डोकेदुखी होते. चिडचिड होते, भूकेवर परिणाम होतो.

टीव्ही, मोबाईलचा वापर
अंथरुणात पडून मोबाईलवर बोलणे, सोशल मीडियावर रमणे, टीव्ही पाहणे, यामुळे झोपेवर वाईट परिणाम होतो. झोपण्यापूर्वी किमान ३० मिनिटे आधी हे सर्व बंद करा.

योग्यप्रमाणात जेवण करा
रात्रीचं जेवण कमी करा. जेवल्यावर लगेच झोपू नका. किमान तासाभराने झोपा.

दिवे बंद करा
रात्री झोपण्यापूर्वी किमान तासभर आधी घरातले मोठे दिवे बंद करा.

धुम्रपान टाळा
झोपण्यापूर्वी सिगारेट पिण्याची सवय घातक आहे. ही सवय मेंदूला त्रासदायक आहे. याचा झोपेवर परिणाम होतो.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु