‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : नकळत काही सवयी आपल्याला जडतात. या सवयी फार गंभीर नसल्या तरी कालांतराने अशा सवयींमुळे आजारी पडण्याचा धोका वाढतो. यासाठी काही चांगल्या सवयी लावून घेतल्यास आजारी पडण्याची शक्यता कमी करता येऊ शकते. जास्त आराम करण्याची सवयदेखील आजारपणाला आमंत्रण देणारी मानली जाते. याच सवयी प्रकृती बिघडवतात. काही सवयी चांगल्या दिनचर्येमध्ये सामील केल्यास शरीर निरोगी राहू शकते.

१) योग्य आहार शरीराला निरोगी ठेवतो. जास्त तेटकट आणि मसाल्याचे पदार्थ खाऊ नयेत. फास्टफुड जास्त खाल्ल्यास किंवा वेळेवर जेवण न केल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे लठ्ठपणासुध्दा वाढतो. उच्चरक्तदाब आणि मधुमेहासारखे आजार होऊ शकतात. रोजच्या आयुष्यात संतुलित आहाराला प्राधान्य द्यावे.

२) जेवण झाल्यानंतर बसून राहिणे किंवा झोपणे शरीरासाठी चांगले नाही. जेवण झाल्यानंतर काहीवेळ फिरणे प्रकृतीसाठी खूप फायदेशीर असते. जेवल्यानंतर आराम केल्यास लठ्ठपणा आणि पोटासंबंधीत समस्यांना समोरे जावे लागते.

३) व्यायाम केल्यास शरीराला उर्जा प्राप्त होते. नको असलेली चरबी नाहीशी होते. नियमित आसन आणि प्राणायम केल्यास मधुमेहासह हृदयाच्या आजारांपासून सुटका होते.

४) धुम्रपान आणि मद्यपान करणे टाळावे. धुम्रपानाने टी.बी., कर्करोगासारखे अनेक गंभीर आजार होतात. तसेच, मद्यपानानेसुध्दा शरीरावर वाईट परिणाम होतो. जास्त धुम्रपान पुरूषांध्ये नपुंसकता वाढवते. महिलांमधील आई होण्याची क्षमता कमी होते.

५) निरोगी राहण्यासाठी दिनचर्या नियमित असावी. सकाळी लवकर उठले पाहिजे. सकाळी उशीरा उठणारे लोक पूर्णत: निरोगी राहत नाहीत. दिवसा जास्त झोपल्याने शरीरावर वाईट परिणाम होतात. दिवसा झोपण्याची सवय टाळावी. सकाळी लवकर उठण्याची सवय लावली तर शरीर तंदुरूस्त राहते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु