‘फ्रोझन’ आणि ‘डबाबंद’ पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक! जाणून घ्या

‘फ्रोझन’ आणि ‘डबाबंद’ पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक! जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सध्या वेळेची कमतरता जाणवत असल्याने अनेकांचे बाहेरचे खाणे वाढले आहे. तसेच बाहेरचे पदार्थ खाण्याचा ट्रेंडदेखील आहे. परंतु, बाहेरील फ्रोझन आणि डबाबंद पदार्थांमुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते. चायनीज पदार्थांमधील अजिनामोटोमुळे मधुमेह, रक्तदाब, अल्सर, गॅसेस, लठ्ठपणा यासारख्या समस्या होऊ शकतात. अन्न जास्त काळ टिकवण्यासाठी त्यामध्ये मोठया प्रमाणावर प्रिझर्व्हटिव्ह, व्हिनेगर, कृत्रिम रंग टाकले जातात. यामुळे आरोग्याची मोठी हानी होते.

हे लक्षात ठेवा

१) हे पदार्थ प्रथम गरम पाण्यात धुतले असल्याने यातील क, ब जीवनसत्वे नष्ट होतात.
२) डबाबंद फळांच्या प्रक्रियेत साली काढल्या गेल्याने फायबर खूप कमी होते.
३) या पदार्थांमध्ये मोनो-सोडियम ग्लुटामेट, सोडियम टार्टारेट असे क्षार मिसळले जातात. त्यामुळे नैसर्गिक पदार्थांपेक्षा क्षार जास्त असतात.
४) डबाबंद पदार्थ साखरेच्या पाकात टिकवले जात असल्याने साखरेचे आणि उर्जेचे प्रमाण खूप वाढल्याने लठ्ठपणा, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार होऊ शकतो.
५) डबाबंद अन्न, प्रोसेस्ड अन्न, प्रिझव्र्हेटिव्ह टाकलेले अन्न यामुळे पचनाचे विकार होतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु