शरीराला तत्काळ उर्जा मिळण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा, जाणून घ्या

शरीराला तत्काळ उर्जा मिळण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीराची ऊर्जा पातळी सतत खालावलेली वाटण्याचे कारण म्हणजे आहार किंवा जीवनशैली असू शकते. आहारामध्ये काही विशेष बाबींवर लक्ष ठेवून या कंटाळा आणि अशक्तपणापासून सुटका मिळवता येते.

फायबर
सकाळच्या न्याहारीमध्ये उच्च फायबर घेतल्यास पूर्ण दिवस उत्साही जाणवतो. सकाळी नाष्ट्यात हाय फायबर सीरियल म्हणजे ओट्स आदी घेतल्यास तणाव कमी होतो आणि जास्त थकवाही जाणवत नाही. फायबर पोटात अन्नाला हळूहळू शोषून घेते. ज्यामुळे रक्त शर्करेची पातळी नियमितपणे वितरित केली जाते. जास्त वेळपर्यंत ऊर्जा कायम राहते.

फळे 
जर्दाळू, केळी, टरबुजामध्ये पोटॅशियम भरपूर असते. यामुळे जीवनसत्त्व, मिनरल्स, अँटी ऑक्सिडेंट शरीराला मिळते. ज्यामुळे तत्काळ ऊर्जा मिळते.

पाणी
पाणी किंवा इतर पदार्थांचा कमी वापर करणाऱ्या ९२ टक्के अ‍ॅथलीट खेळाडूंना लवकर थकवा जाणवतो. लक्ष केंद्रित करण्यातदेखील कठीण होते. असे एका संशोधनात दिसून आले आहे. त्यामुळे वारंवार तहान लागल्याची जाणीव होऊ नये म्हणून प्रत्येक तासाला पाणी प्यावे.

सी-वीड सॅलेड
जपानमध्ये तत्काळ ऊर्जेसाठी मीजो सूप, अ‍ॅडामेन आणि सी-वीड कोशिंबीरचे सेवन केले जाते. यामध्ये आयोडीनचे प्रमाण जास्त असते. यामुळे ऊर्जा मिळते.

चहा 
चहामध्ये कॅफीन आणि अमिनो अ‍ॅसिड एलथिनाइनचे मिश्रण असते. हे मेंदूचा थकवा घालवण्यासाठी मदत करते. तसेच उत्साह आणि स्मरणशक्तीलाही चालना देते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु