वैवाहिक आयुष्यात आनंद टिकवून ठेवण्यासाठी प्या ‘हे’ खास सूप

वैवाहिक आयुष्यात आनंद टिकवून ठेवण्यासाठी प्या ‘हे’ खास सूप

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शेवगा हे औषधी गुणधर्म असलेले झाड आहे. याची साल, शेंगा, पाने, फुले सर्वांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने विविध औषधींमध्ये त्याचा वापर केला जातो. शेवग्याच्या शेंगाची भाजी चविष्ट असल्याने ती घरोघरी आवर्जून बनविली जाते. या शेंगा सुद्धा खुप औषधी आहेत. शेवग्याचा सूप पिणे खुप लाभदायक आहे. यात व्हिटॅमीन सी, बीटा केरोटीन, प्रोटीन, मॅगनीज, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर आणि अनेक प्रकारचे गुणधर्म भरपूर असतात.

असे तयार करा सूप

दोन कप पाणी घेऊन ते मंद आचेवर उकळवा. या उकळत्या पाण्यात शेवग्याच्या शेंगांचे छोटे-छोटे तुकडे करून टाका. शेवग्याची पानेही टाकता येतील. पाणी अर्धे झाल्यानंतर शेवग्याच्या शेंगांमधील गर काढून घ्या. वरचा भाग वेगळा करा. यामध्ये थोडे मीठ आणि मिरपूड टाकून प्या.

हे आहेत फायदे

१) दम्याची समस्या असल्यास हे सूप पिणे लाभदायक आहे.
२) सर्दी-खोकला आणि कफपासून सुटका मिळवण्यासाठी उपयोगी आहे.
३) यामुळे रक्त शुध्द होते, आणि यामुळे चेहरा उजळतो.
४) मधुमेह नियंत्रित राहतो.
५) हे सूप नियमित प्यायल्यास सेक्शुअल हेल्थ सुधारते. हे महिला आणि पुरुष दोघांसाठी फायदेशीर आहे.
६) याच्या अँटी-बॅक्टेरियल गुणामुळे अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून रक्षण होते.
७) यामधील व्हिटॅमीन सी इम्यून सिस्टम बूस्ट करण्याचे काम करते.
८) पचनक्रिया मजबूत होते. यातील फायबर्समुळे बध्दकोष्ठची समस्या होत नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु