अनिद्रेने त्रस्त आहात ?…तर ‘हा’ रामबाण उपाय करा, इतरही आहेत अनेक फायदे

अनिद्रेने त्रस्त आहात ?…तर ‘हा’ रामबाण उपाय करा, इतरही आहेत अनेक फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – दुधात साखर मिसळून पिण्याऐवजी गुळ मिसळून प्यायल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात. अनिद्रेची समस्या असल्यास झोपण्याअगोदर एक ग्लास गरम दुधात गूळ मिसळून प्यावे. यामुळे अनिद्रेची समस्या दूर होते. रक्त शुद्ध होते, शरीरात ऊर्जा निर्माण होते. तसेच शरीर रिलॅक्स होते.

हे आहेत अन्य फायदे

मासिक पाळीचा त्रास
मासिक पाळीचा त्रास होत असल्यास गरम दुधात गूळ टाकून प्या. गुळ खाल्ल्यास थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. गरोदर महिलांनी रोज गुळाचे सेवन केल्यास अ‍ॅनिमिया होत नाही.

वजन घटवा
लठ्ठपणा दूर करण्यासाठी दूध किंवा चहामध्ये साखरेऐवजी गूळ मिसळून प्या. यामुळे वजन कमी होते.

पचनक्रिया सुधारते
दूध आणि गूळातील पोषक तत्त्व पोटात चांगल्या बॅक्टेरियांना वाढविण्यास मदत करतात. यामुळे पचन व्यवस्थित होते. पचनक्रियेच्या सर्व समस्या दूर होऊन पोटात गॅससुद्धा होत नाही.

मजबूत हाडे, सांधेदुखी
दूध आणि गूळ दोघात कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्याने शरीर सुदृढ होते, हाडांचे आजार, सांधेदुखी, हे त्रास दूर होतात. रोज गुळाचा लहान तुकडा अद्रकसोबत सेवन करा. नंतर गरम दूध प्यावे.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु