फक्त ७ दिवस कच्चा लसूण आणि मध खाल्ल्याने होतील ‘हे’ ७ चमत्कारी फायदे

फक्त ७ दिवस कच्चा लसूण आणि मध खाल्ल्याने होतील ‘हे’ ७ चमत्कारी फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मध आणि लसणाचा वापर करून प्राचीन काळापासून उपचार केले जात आहेत. या उपायाने अनेक गंभीर आजार बरे होतात. सतत आजारपण, कोणत्याही कामात लक्ष न लागणे, हे इम्यून सिस्टम कमकुवत असल्याचे लक्षण आहे. इम्यून सिस्टम कमकूवत असल्याने अनेक आजार होतात. या समस्येवर लसूण आणि मध एकत्र करुन खाल्ल्याने हे अँटीबायोटिकचे काम करते. कच्चा लसूण आणि शुध्द मध खाल्ल्याने कोणते चमत्कारी फायदे होतात, हे जाणून घेवूयात.

औषध असे बनवा
लसणाच्या २-३ मोठ्या पाकळ्या कुटून घ्या आणि यामध्ये शुध्द मध मिसळा. जोर्यंत लसणामध्ये मध पुर्णपणे मिसळत नाही तोपर्यंत हे तसेच राहू द्या. हे मिश्रण सकाळी उपाशीपोटी ७ दिवस घ्यावे. यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते. तसेच वजन कमी होते.

डायरिया 
डायरिया होत असेल तर लसूण आणि मधाचे मिश्रण खावे. यामुळे पाचन तंत्र दुरुस्त होते आणि पोटातील संक्रमण दूर होते.

सर्दी-पडसे 
हे खाल्ल्याने सर्दी-पडसे आणि साइनसचा त्रास कमी होतो. हे मिश्रण शरीराची उष्णता वाढवते आणि आजारांना दूर ठेवते.

फंगल इंफेक्शन 
फंगल इंफेक्शन शरीराच्या अनेक भागांवर होऊ शकते. परंतु अँटी-बायोटिक युक्त हे मिश्रण बॅक्टेरिया नष्ट करते. फंगल इंफेक्शनची समस्या दूर होते.

डीटॉक्स
हे एक नैसर्गिक डीटॉक्स असून यामुळे शरीरातून खराब आणि दूषित पदार्थ बाहेर निघतात.

इम्यूनिटी 
लसूण आणि मध एकत्र खाल्ल्याने यामधील शक्ती वाढते. हे इम्यून सिस्टमला मजबूत करते. इम्यून सिस्टम मजबूत असल्याने कोणताच आजार होत नाही.

हृदयरोग 
हे मिश्रण खाल्ल्याने हृदयमार्गातील धमन्यांमध्ये जमा झालेली चरबी दूर होते. ज्यामुळे रक्तप्रवाह योग्य प्रकारे हृदयापर्यंत पोहोचतो. यामुळे हृदयाची सुरक्षा होते.

घसा
हे मिश्रण घेतल्याने घशाची अ‍ॅलर्जी दूर होते. कारण यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. हे घशांची खाज आणि सूज कमी करते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु