समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोणताही छोटा आजार झाल्यास घरातील ज्येष्ठ मंडळी काही घरगुती उपाय सांगतात. हे उपाय केल्यानंतर आजार चुटकीसरशी दूर होतात. प्रत्येकजण लहानपणापासून या गोष्टी अनुभवत असतो. आजीच्या बटव्यातून अशाच प्रकारची औषधे बाहेर निघत असत. आईसुद्धा खोकला आल्यास आपल्या मुलांना हळद टाकलेले दूध अथवा मध, हळद, आले यांचे चाटण देते. हे चाटण थोडावेळ चाटल्यास काही वेळातच खोकला गायब होतो. परंतु, या मागचे विज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न कुणीही करताना दिसत नाही.
अशी अनेक औषधे आहेत, जी आपण घरातील ज्येष्ठांच्या सांगण्यावरून आजही घेत असतो. अशाच काही औषंधांची माहिती आपण त्यामागील विज्ञानासह जाणून घेणार आहोत. लवंग तेलातील युजेनॉल घटक हा एक सुगंधित पदार्थ असून तो फक्त लवंग तेलातच असतो. हा युजेनॉल नॉसिसेप्टर्स म्हणजेच वेदनांची अनुभूती देणाऱ्या रिसेप्टरची संवेदनशीलता कमी करतो. तसेच गाजरामुळे डोळे निरोगी राहतात. कारण गाजर अ जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत आहे. साधारणत: जेवणात अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळेच डोळ्यांचा प्रकाश कमकुवत होतो. गाजरासह भरपूर अ जीवनसत्त्व असलेल्या खाद्य पदार्थांचेही सेवन करता येते.
आणखी एक घरगुती औषध म्हणजे मधमाशी चावल्यानंतर त्वचेत अनेक विषारी पदार्थ इंजेक्ट होतात. यामुळे तीव्र वेदना होतात आणि सूज येते. अनेकवेळा चावल्यानंतर मधमाशी शरीरात दंश सोडते. त्यातून लागोपाठ विषारी पदार्थ निघत राहतो. अशावेळी त्या जागेवर थोड्या वेळासाठी टूथपेस्ट घासल्याने विषारी पदार्थाचा परिणाम कमी होतो. तसेच टूथपेस्टमध्ये असलेले ग्लिसरीन त्वचेतील विषारी पदार्थाचा परिणाम नष्ट करते. मेथी दाण्यामध्ये भरपूर फायबर आणि स्टेरॉइड दोन पद्धतीने काम करतात. एक म्हणजे शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात. याची मधुमेह्यांसाठी खूप गरज भासते. दुसरे म्हणजे यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो. तसेच मेथी दाण्यांमुळे प्रतिकारशक्तीही वाढते, असे तज्ज्ञ सांगातात.