सावधान ! साबण आणि टूथपेस्टने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – साबण आणि टूथपेस्ट या दोन गोष्टी आपल्या रोजच्या वापरातील गोष्टी आहेत. कारण सकाळी उठल्यानंतर लगेच आपल्याला टूथपेस्ट आणि साबणाची गरज पडते. त्यामुळे दैनंदिन वापरातील या दोन गोष्टी आपल्याला अतिमहत्वाच्या वाटतात. मात्र यापासून आपल्या आरोग्याला काही धोका पोहचू शकतो. याचा आपण कधी विचारही करू शकत नाही. या दोन गोष्टींचा अतिवापर आपल्या आरोग्यासाठी घातक आहेत. दरम्यान नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनानुसार साबण आणि टूथपेस्ट या दोन गोष्टी महिलांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहेत.

साबण आणि टूथपेस्टमध्ये ट्राइक्लोसैन हे तत्व असतात. महिलांनी जर साबण आणि टूथपेस्टचा वापर केला तर त्यांना ‘ऑस्टियोपोरोसिस ‘ हा रोग होण्याची शक्यता जास्त असते.तसेच महिलांमध्ये अगोदरच कॅल्शियमचे प्रमाण कमी असते. त्यामुळे त्यांना हा रोग होण्याचा धोका जास्त असतो. महिलांच्या यूरिनमध्ये ट्राइक्लोसैन जास्त आहे. त्यामुळे त्यांना हाडांच्या समस्या जास्त असतात. तसेच ट्राइक्लोसैन थायरॉइड आणि रिप्रोडक्टिव सिस्टमवर दुष्परिणाम करते. परंतु, ट्राइक्लोसैनमुळेच ऑस्टोयपोरोसिस हा आजार होतो. हे अजून सिद्ध झालं नाही.

हा आजार वयाच्या ५० वर्षानंतर होऊ शकतो. या आजारात हाडांचा वजन खूप कमी, हाड खूप ठिसूळ होतात. आणि शिंका ही जास्त येतात.या पार्श्वभूमीवर एका मेडिकल कॉलेजने माहिती दिली आहे कि, त्यांच्या प्रयोगशाळेत त्यांनी जनावरांवर प्रयोग केला होता. जनावरांच्या बोन मिनरल डेंसिटीवर दुष्परिणाम झाला होता. त्यामुळे साबण आणि टूथपेस्ट यांचा अतिवापर माणसाच्या आरोग्यासाठीही खूप हानिकारक आहे. असं समोर आलं आहे.