‘या’ आजारांची भीती वाटतं असेल तर ‘हे’ १६ उपाय नक्की करा ;  जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सध्या काही अपवाद सोडले तर आपल्याला एकही अशी व्यक्ती सापडणार नाही की त्या व्यक्तीला एखादा आजार नसेल. तुम्हाला जर कोणता आजार होण्याची भीती असेल तर तुम्ही खालील १६ उपाय जर केले. तर तुम्हाला कोणताच आजार होणार नाही. त्यामुळे कोणता आजार न होण्यासाठी काय करावे. हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर खालील टिप्स फॉलो करा.

१) कर्करोगापासून वाचण्यासाठी नियमित कढीपत्त्याचा रस प्या.

२) हृदयविकाराची भीती वाटत असल्यास नियमित अर्जुनासव प्या.

३) मूळव्याध होऊ नये यासाठी दररोज सकाळी पानफुटीची पाने खा.

४) मूत्राशयाचे विकार होऊ नयेत यासाठी दररोज सकाळी कोथिंबिरीचा रस रिकाम्या पोटी प्या.

५) पित्त होणे टाळण्यासाठी नियमित आवळा रस प्या.

६) सर्दी होऊ नये यासाठी नियमित कोमट पाण्यात हळद घालून प्या.

७) टक्कल पडण्याची भीती वाटत असेल तर वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात उकळून गाळून आंघोळीपूर्वी डोक्याला मालीश करा.

८) मधुमेहापासून रक्षण होण्यासाठी तणावमुक्त जीवन जगा, व्यायाम करा, जागरण टाळा. साखर खाणे बंद करा. गूळ खा.

९) भीतीमुळे झोप येत नसेल तर रात्री जेवणापूर्वी २ तास आधी अश्वगंधारिष्ट ग्लासभर पाण्यात घालून प्या.

१०)  रिकाम्या पोटी हातपाय शेकवा. भरपूर ऐका मात्र कमी बोला.

११) हातापायाचे तळवे जेथे दुखत असतील ते पंपिंग करून दाब द्या. ध्यानधारणा करा.

१२) पायाचे तळवे  दुखत असतीलपा तर पायाखाली लाटणे घेऊन त्यावर तळवे फिरवा. गरज असेल तरच घरगुती औषधे घ्या.

१३) आठवडय़ातून एकदा तरी तेलाने सर्व शरीराला मालीश करा. सकारात्मक वर्तन आणि विचार ठेवा.

१४) नियमित प्राणायाम करा.

१५) सकाळी एक-दोन ग्लास कोमट पाणी प्या.

१६)  वात, पित्त आणि कफ प्रकृती ओळखून उपचार करा.