आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आजकाल प्रत्येकजण आरोग्यासाठी (Health Tips) खूप सकारात्मक झाला आहे. कोरोनाच्या काळात (Coronavirus) आरोग्य ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे हे सर्वांनाच समजले आहे. अशा स्थितीत दररोज वापरण्यात येणारी साखर (Sugar) आरोग्यासाठी हानिकारक आहे. अनेकांना फिका चहा पिणे आवडत नाही. यासाठी आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल (Health Tips) सांगत आहोत, ज्या तुम्ही साखरेऐवजी वापरू शकता (Sugar can be harmful to health. Here are 4 sugar options for sweet tea).
हे पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात आणि चहामध्ये नैसर्गिक गोडवा (Natural Sweetener) आणू शकतात. मात्र, याचा अर्थ असा नाही की यामुळे तुम्ही जास्त चहा प्यावा.
1) चहामध्ये गूळ मिसळा (Mix jaggery in Tea)
वजन कमी करायचे असेल आणि चहा सोडू शकत नसाल तर गुळाचा चहा (Jaggery Tea) प्या. गुळाचा गोडवा चहाची चव आणि रंगही बदलतो. यासोबतच गुळात भरपूर अँटीऑक्सिडंट्स (Antioxidant) असतात आणि त्याचबरोबर यामध्ये केमिकल्स नसतात.
2) बडीशेपचा चहा (Fennel Tea)
आपण चहामध्ये बडीशेप (Fennel) घालू शकता. बडीशेप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चहा प्यायल्यानंतर गॅस होत असेल तर चहामध्ये बडीशेप टाकू शकता (Health Tips).
3) मुलेठी (Mulethi)
आयुर्वेदिक औषधांमध्ये (Ayurvedic Medicine) मुलेठीचा वापर केला जातो. मुलेठी तुम्हाला घसादुखीपासून आराम देऊ शकते.
या चहात लवंग (Clove) आणि दालचिनीचा (Cinnamon) वापर केला जाऊ शकतो. हा हर्बल चहा (Herbal Tea) प्रमाणे असेल.
4) मध (Honey)
मध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही तुमच्या चहामध्ये मध घालू शकता, ते नैसर्गिक स्वीटनर म्हणून काम करते.
साखरेपेक्षा मध कितीतरी चांगला पर्याय आहे.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Health Tips | you can replace sugar with these things for tea
Super Foods | हळदीपासून मशरूमपर्यंत, कॅन्सरसोबत लढू शकतात ‘हे’ सुपरफूड, जाणून घ्या
Diabetes | डायबिटीज रूग्णांनी ‘या’ पांढर्या गोष्टी अजिबात सेवन करू नये, जाणून घ्या कोणत्या