आरोग्यनामा ऑनलाईन- Eye Paralysis Symptoms : ऑक्यूलर पॅरालिसिसला डोळ्यांचा लकवा म्हणतात. हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये डोळ्यांच्या बुबळांची हालचाल बंद होते. ज्यामुळे व्यक्तीला पाहताना त्रास होऊ लागतो. प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात 6 एक्स्ट्राऑक्युलर मसल्स असतात. ज्यामधून 4 रेक्टाय आणि 2 ऑबलिक मसल्स असतात. एक्स्ट्राऑक्युलर मसल्सच्या मदतीने व्यक्ती आपले डोळे डावीकडे-उजवीकडे वर-खाली हलवू शकतो. जर कोणत्याही कारणामुळे या एक्स्ट्राऑक्युलर मसल्समध्ये अंशत: लकवा झाला तर आयबॉलचा मूव्हमेंट प्रभावित होते आणि व्यक्तीची इच्छा असूनही आयबॉल हलवू शकत नाही. अशा स्थितीला डोळ्यांचा लकवा म्हटले जाते.
ही आहेत कारणे
-डोळ्यात खुप वेदनांसह डोळे लाल होणे, डोळ्यातून सतत पाणी येणे.
-डोळ्यांची बुबळे अचानक एकाच बाजूला राहणे किंवा पापण्या खाली पडणे.
-डबल व्हिजन ज्यामध्ये व्यक्तीला एक वस्तू दोन-दोन दिसतात.
-जीव घाबरणे आणि चक्कर येणे.
हे आहेत उपाय
धैर्य बाळगा
ऑक्यूलर पॅरालिसिसने पीडित व्यक्तीला ताबडतोब चांगल्या नेत्ररोग तज्ज्ञांकडे दाखवावे. वेळीच उपचार झाला तर समस्या लवकर बरी होऊ शकते.
थेरेपीने उपचार
प्रारंभिक स्थितीत पेन मॅनेजमेंटसह स्टेरॉयड आणि मिथाइलकोबाल्मीन आणि पायरीडोक्सिनची थेरेपी खुप प्रभावशाली ठरते.
एक्सरसाईज आणि सर्जरी
डोळ्यांच्या बुबळांच्या अंशत: लकव्याला सिनेप्टोफोर एक्सरसाइज आणि प्रिझ्म युक्त चष्म्याने ठिक केले जाऊ शकते. जर रूग्णाच्या डोळ्याचे बुबुळ चलन 6 महिन्यात बरे झाले नाही तर या स्थितीत सर्जरीचा सुद्धा पर्याय अवलंबला जाऊ शकतो.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.