आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Health Tips | रक्तात फॅट आणि कॉलेस्ट्रोलसह इतर गोष्टी जमा झाल्याने धमण्यांमध्ये ब्लॉकेज तयार होते. यामुळे हृदयात रक्तप्रवाह कमी होतो आणि हृदय विकाराचा झटाक येऊ शकतो. तर, मेंदूकडे जाणार्या धमण्यांमध्ये प्लाक जमा झाल्याने ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. धमण्यांमध्ये प्लाक तयार होणे टाळण्यासाठी या सोप्या टिप्स (Health Tips) जाणून घेवूयात.
1. हेल्थ एक्सपर्टनुसार, धमण्यांमध्ये प्लाक तयार होणे रोखण्यासाठी आहाराकडे लक्ष द्या. आहारात गावठी तूप, आक्रोड, आवळा, मासे आणि अवाकोडो इत्यादीचे सेवन करा.
2. सोबतच आहारात फायबर युक्त पदार्थांचे सेवन करा. यासाठी गहू, ओट्स, डाळी, भाज्या आणि बिन्सचे सेवन करा.
3. रोज व्यायाम करा. ब्रिस्क वॉकिंग, पोहणे, योगा आणि प्राणायाम करू शकता.
4. आहारात हानिकारक वसा घेऊ नका. यासाठी रोज खाद्यतेल (व्हेजिटेबल ऑईल), प्रोसेस्ड मीट, रेड मीड इत्यादीचे सेवन कमी करा. साखर सुद्धा कमी खा.
5. धूम्रपान आणि मद्यपान अजिबात करू नका.
Web Titel :- Health Tips | follow these easy tips to remove the problem of blockage in the arteries