आरोग्यनामा ऑनलाईन- नवी दिल्ली : अनेकांच्या पापणीवर गाठ आलेली दिसते. सामान्यपण याकडे किरकोळ समस्या म्हणून दुर्लक्ष केले जाते. ही समस्या एक प्रकारच्या इन्फेक्शनची समस्या आहे. ही गाठ पापणीच्या वर किंवा खाली सुद्धा येते. ही गाठ मेबोमियन किंवा ऑईल ग्लँडमध्ये ब्लॉकेजमुळे तयार होते.
ही आहेत कारणे
-वायरल कंजक्टिवायटिसने ग्रस्त लोकांना हा त्रास होऊ शकतो.
-डोळ्यांच्या आत संसर्ग पसरल्याने होऊ शकते गाठ.
-पापण्यांवर संसर्ग झाल्याने.
-सेबरेया, रोजेसा, मुरूमे, क्रॉनिक ब्लेफेरायटिसची समस्या असलेल्यांना गाठ होऊ शकते.
ही आहेत लक्षणे
-पापण्यांवर गाठ आणि सूज दिसणे.
-पाहताना अडचण येणे.
-गाठीच्या जवळपास जाडसरपणा जाणवतो.
-कधी-कधी पापण्यांवर लालसरपणा दिसणे.
हे आहेत उपाय
– गाठ शेकणे
गाठ दिवसात 4 ते 5 वेळा शेकावी. यासाठी एक सूती कपडा घेऊन तो गरम पाण्यात भिजवावा नंतर पिळून डोळ्यांना शेक द्यावा.
-सतत हातांनी गाठीला स्पर्श करू नका
डोळ्यांना खराब हातांनी स्पर्श करू नका. यामुळे त्रास वाढू शकतो.
-हलक्या हाताने मसाज
प्रथम हात स्वच्छ करा. यानंतर हळुहळु गाठीवर मसाज करा. गाठीत भरलेला द्रव पदार्थ हळु-हळु बाहेर निघू लागतो.
-आय मेकअप टाळा
जोपर्यंत पापण्यांची गाठ बरी होत नाही तोपर्यंत मेकअप करू नका. लेन्स लावू नका. अन्यथा त्रास वाढू शकतो.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.