आरोग्यनामा ऑनलाईन टीम – साधारणतः छातीत चमक निघणे हे हृदयरोगाचे लक्षण असते. पण महिलांमध्ये काही सामान्य आजार असतात. त्या लक्षणांमुळे महिलांना हृदयरोग होण्याचा धोका जास्त असतो. परंतु, अनेक महिला या सामान्य आजारांकडे दुर्लक्ष करतात आणि हृदयरोगासारख्या आजाराला बळी पडतात. माहिंलामधील डोकेदुखीचा आजारही त्यांच्या मृत्यूचे कारण ठरू शकते. त्यामुळे अशा सामान्य आजरांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका.
ही असू शकतात हृदय रोगाची लक्षणे –
१) पाठीत किंवा जबड्यामध्ये दुखत असेल तर आपण त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. पण तुम्हाला जर हा त्रास होत असेल तर हे हृदयरोगाचे लक्षण असू शकते. त्यामुळं महिलांनी या आजाराला सामान्य आजार समजू नये.
२) महिलांना जर उलटी येत असेल किंवा मळमळ होत असेल तर पित्तामुळे किंवा काही खाण्यात आल्यामुळे हा त्रास होतोयं असं महिलांना वाटत. पण खरं तर या त्रासामुळे तुम्हाला हृदयरोगाचा धोका असू शकतो.
३) तुमच्या पोटात जर जास्त दुखत असेल आणि तुम्हाला जर खूप घाम येत असेल तर तुम्ही लगेच डॉक्टरांकडे जा. कारण यामुळे तुम्हाला हृदयरोगासारख्या आजाराला बळी पडावे लागेल.
४) तुम्हाला जर अचानक अवस्थपणा जाणवायला लागला आणि खूप थकून गेल्यासारखं झालं तर तुम्हाला हृदयरोग होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या आजाराकडे जास्त दुर्लक्ष करू नका. कारण हे तुमच्या जीवावर बेतू शकते.