आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपण दररोज सारखं काही ना काही खात असतो. पोटात गेलेल्या काही पदार्थांचं चांगलं पचन होत तर काही पदार्थांच अजिबात पचन होत नाही. आणि सारखं काही न काही खात राहिल्यामुळे पोटालाही आराम मिळत नाही. आपण जस मोबाईल हँग होत असल्यावर त्याला रिफ्रेश करतो. तस आपल्या पोटालाही कधीतरी रिफ्रेश करणं महत्वाचं आहे. त्यामुळे पोटाला कधीतरी एकदिवसीय क्लिझिंग डाएट द्या.
असे करा क्लिगंजिंग डाएट –
१) तुम्हाला ज्या दिवशी तुमच्या डाएट करायचे आहे. त्यादिवशी कोणतेही शिजवलेले अन्न खाऊ नका. त्याऐवजी फळं आणि कच्च्या भाज्या खा.ते पचायला ही सोपे असते. या डाएटमुळे तुमच्या आरोग्यावरही काही परिणाम होणार नाही. आणि तुमच्या पोटालाही आराम मिळेल.
२) आपण जर दिवसभर आपल्या शरीराला पाहिजे तेवढं पाणी पिलो तर आपल्याला कोणताच आजार होणार नाही. पण आपण तस करत नाही. त्यामुळे कमीतकमी ज्या दिवशी आपण डाएट करत आहोत. त्यादिवशी मात्र ८ ग्लास पाणी प्या.
३) अनेकांना चहा घ्यायला खूप आवडत. आणि त्यामुळेच अनेक आजार आपल्यासमोर थैमान घातलात. पण तुम्ही जर औषधी चहाला प्राधान्य दिल तर तुमचं आरोग्य नीट राहील. त्यामुळे डाएट करत असतानाही औषधी चहा घ्या.
४) धूम्रपान करणे हे तर आपल्या शरीरासाठी घातकच आहे. परंतु आपण निरोगी राहाव म्हणून डाएट करत असतो. त्यामुळे डाएट करत असताना धूम्रपान किंवा मद्यपान करणं कटाक्षानं टाळावं. यामुळे तुमचा डाएट सक्सेस होईल.
५) फळांचा रस हा आपल्या आरोग्यासाठी चांगला असतो. त्यामुळे डाएट करत असताना कोणताही आहार घेण्याऐवजी संत्र, कलिंगड, द्राक्ष, मोसंबी, अननस, सफरचंद, डाळिंब अशा ताज्या फळांचा रस काढून प्यावा.
अशाप्रकारे आपण जर एकदिवसीय डाएट केलं तर आपली त्वचा तजेलदार राहील. तसेच आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. आणि आपण निरोगी आयुष्य जगू त्यामुळे कधीतरी क्लिंगजिंग डाएट करा.