आरोग्यनामा ऑनलाईन टीम – प्रत्येक व्यक्तीला आकर्षक आणि सुंदर दिसायचे असते. पण धकाधकीच्या जीवनात त्वचेचे आरोग्य वा सौंदर्य सगळ्यांनाच टिकवता येत नाही. मग आपण सोपे मार्ग शोधत असतो. मार्केट मधून केमिकल रहित ब्युटी प्रॉडक्ट्स खरेदी करतो किंवा ब्युटी पार्लर मध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स घेऊन त्वचेला आकर्षक बनवण्याच्या नादात पडतो पण, बाजारात स्वस्त आणि नैसर्गिक किंवा आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स उपलब्ध असतात आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आणि उगाच महाग उत्पादने खरेदी करून चेहऱ्याची सुंदरता घालवतो. चेहऱ्याला आकर्षक बनवणारे आयुर्वेदिक रक्तचंदन कसे उपयोगी पडते जाणून घेउया.
सौंदर्य खुलवण्यासाठी असा करा रक्तचंदनाचा समावेश
१) रक्तचंदन, मध आणि हळद
गुलाबपाण्यात रक्तचंदन उगाळून, एक चमचा मध आणि हळद मिसळून पॅक बनविणे.
हा पॅक चेहऱ्यावर लावून ठेवावा. थोड्यावेळानंतर पॅक सुकल्यावर कोमट पाण्याने धुवावा.
चेहऱ्यावरील काळे डाग, पुरळ रक्तचंदनाच्या या पॅकमुळे कमी होते व रक्तचंदन थंड असल्याने त्वचेतील दाह कमी होतो.
२) रक्तचंदन आणि दही
एक चमच रक्तचंदनाच्या पावडरमध्ये हळद आणि थोडे दही मिसळा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. काही मिनिटे तसाच ठेवा. नंतर स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनदा हा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा. याने चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होतील.
त्वचेवरील काळे डाग, काळपटपणा, आणि स्किनटोन तसेच पिगमेंटेशन या सर्व समस्यांवर रक्तचंदनचा फेसपॅक गुणकारी ठरतो.
त्वचेच्या अंतर्गत भागात ओलावा टिकून राहिल्याने चेहरा तजेलदार बनतो.
३) रक्तचंदन आणि लिंबू
एक चमचा रक्तचंदनामध्ये लिंबाचे काही थेंब मिसळा. हा पॅक चेहर्यावर नीट लावावा. १५ मिनीटे हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून ठेवावा नंतर चेहरा स्वच्छ धुवावा.
तेलकट चेहऱ्यावर रक्तचंदन लावणे फायदेशीर आहे. यामुळे त्वचेवरील पोअर्स टाईट होण्यास मदत होईल. तसेच अतिरिक्त सिबम आटोक्यात ठेवण्यास मदत होते.