आरोग्यनामा ऑनलाइन टीम- पीरियड्समध्ये अनेक महिलांना पोटात खुप वेदना होतात. कंबरेच्या जवळपासचा भाग, मांड्या, पाय आणि पोटाच्या खालच्या भागात सतत जडपणा आणि वेदना होतात. काही महिलांना जडपणा आणि जास्त रक्तस्त्रावाची समस्या सुद्धा असते. पीरियड्स सुरू होण्याच्या 3-4 दिवस अगोदर काही महिलांना पोट फुगण्याची तक्रार सुरू होते. अचानक वजन वाढल्यासारखे वाटते. या लक्षणांना प्रीमेंस्ट्रुअल सिंड्रोम म्हटले जाते. जाणून घेवूयात पीरियड्सदरम्यान करायचे घरगुती उपाय…
हे आहेत घरगुती उपाय
1 पीरियड्सदरम्यान खुप जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. यादरम्यान, हलके पदार्थ आणि पालेभाज्या खाव्यात. सलाडचे प्रमाण वाढवा.
2 पोटॅशियमयुक्त आहार घ्या. जसे की, पालक, रताळे, बिट आणि केळे. यादरम्यान जेवणात खप कमी मीठ टाका.
3 पीरियड्सच्या काळात जास्तीत जास्त पाणी प्या. यामुळे किडनी कार्यरत राहाते आणि शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहाते.
4 बुतांश महिला पीरियड्सदरम्यान चलणे-फिरणे बंदच करतात. पीरियड्सच्या सुरूवातीचे 3-4 दिवस सोडून हलका व्यायाम करणे जरूरी आहे.