हिरव्या पालेभाज्यांसह ‘लाल’ रंगाच्या भाज्यामध्येदेखील आहेत ‘ही’ पौष्टिक तत्व
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – हिरव्या भाज्यांच्या सेवनाने होणारे फायदे आपण नेहमीच ऐकतो. परंतु लाल रंगाच्या भाज्यांमध्ये देखील शरीराला पौष्टिक असे अनेक गुणधर्म आढळून येतात . भाजीचा रंगजेवढा गडद तितकी ती पौष्टिक तत्वांनी भरलेली असते. लाल भाज्यांमध्ये लाइकोपीन, एंथोक्यानिन्स सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात . ज्यामुळे हृदयाच्या आणि प्रोस्टेट ग्रंथींच्या कॅन्सर पासून सुरक्षा मिळते. चला तर मग जाणून घेऊयात या लाल रंगाच्या भाज्यांविषयी –
१. बिट
बीटमध्ये पोटैशियम, फाइबर, फॉलेट, विटामिन सी आणि नाइट्रेट भरपूर प्रमाणात आढळून येते. सलाडमध्ये किंवा ज्यूस करून घेतल्याने ब्लड प्रेशर, ब्लड फ्लो आणि इम्यूनिटी सिस्टम चांगली होते.
२. टोमॅटो
टोमॅटोमध्ये लाइकोपीन, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशिअम मोठ्या प्रमाणावर असते. टोमॅटोच्या सेवनाने प्रोस्टेट कॅन्सर, एसोफेगस कॅन्सर आणि कोलोन कॅन्सर पासून सुरक्षित राहता येते.
३. गाजर
गाजरामध्ये पोटैशियम, फॉलेट, जिंक, फास्फोरस, लाइकोपिन, मैगनीज, कॉपर, आयरन, कैल्शियम आणि अनेक प्रकारचे विटामिन आढळून येतात .
४. डाळिंब
डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणावर फाइबर, प्रोटीन, विटामिन सी, विटामिन के, फॉलेट आणि पोटैशियम असते. जुनाट खोकला, सर्दीसाठी डाळिंबाचे दाणे खावेत
५. कांदा
कांद्यामध्ये ऑर्गेनोसल्फर असते . कांद्याच्या सेवनाने इम्यून सिस्टम चांगली राहते . कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.
Comments are closed.