आरोग्यनामा ऑनलाईन- नवी दिल्ली : चिकू शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करतो. यामध्ये असे घटक असतात जे शारीरासाठी लाभदायक असतात. यामुळे जठर मजबूत होते, तसेच इम्युनिटी सुद्धा वाढते. याच्या नियमित सेवनाने मांसपेशी आणि हाडे मजबूत होतात. कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा धोका कमी होतो. चिकू कोणकोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात…
चिकूचे फायदे
कॅन्सरपासून वाचवण्यास उपयोगी
चिकू कॅन्सरपासून वाचवण्यास उपयोगी आहे. चिकूमध्ये व्हिटॅमिन ए आणि बी, आयर्न, कॅल्शियम, फायबर, अँटी-ऑक्सीडेंट, अँटी बॅक्टेरियल गुण आढळतात. याचे नियमित सेवन शरीरात कॅन्सरच्या पेशी तयार होऊ देत नाही.
डोळ्यांसाठी लाभदायक
चिकूत व्हिटॅमिन ए असल्याने डोळ्यांच्या आजरावर उपयोगी आहे.
सौंदर्य वाढेल
चिकूत अनेक गुणधर्म असल्याने हेल्थ एक्सपर्ट सांगतात रोज एक चिकू खाल्ल्याने सौंदर्य खुलते.
तणाव कमी होतो
चिकूचे सेवन केल्याने मनाला शांती मिळते. याच्या सेवनाने चांगली झोप येते.
सर्दी, खोकला
थंडीतील सर्दी, खोकला, कफ इत्यादीवर चिकू लाभदायक आहे.
बद्धकोष्ठता
चिकूच्या सेवनाने वजन कमी करता येऊ शकते. तसेच बद्धकोष्ठतेच्या समस्येतून आराम मिळतो.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.