आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Health News | कामाचा लोड जास्त असल्याने अनेक जण ऑफिसमध्ये सुद्धा जेवण घाईघाईत उरकतात. कामाच्या ताणामुळे अशाप्रकारे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केले जाते. काही जण तर कामाच्या तणावात चक्क जेवायलाच विसरतात. परंतु, याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतात. खाण्याच्या काही सवयींकडे लक्ष देणे खुप आवश्यक असते. (Health News)
घाई करू नका
जेवण करताना घाई कधीही करु नका. याचे वाईट परिणाम शरीरावर होतात. घाईघाईत जेवल्यास काही असे पदार्थ खातो ज्यांत मोठ्या प्रमाणावर शर्करा आणि फॅट्स असतात. हे पदार्थ तब्येतीसाठी हानिकारक असतात.
चावून खा
जेवताना सरळ आणि ताठ बसा. कामाच्या टेबलवर कसेही बसू नका. प्रत्येक घास चावुन-चावून खा. जास्त चावल्याने जेवणातील जास्तीत जास्त घटक शरीराला मिळतात.
द्रव कॅलरी नको
जेवताना फळांचे ज्यूस पिऊ नका. यात शुगर जास्त असते. जेवताना कोणतेही थंडपेय घेऊ नका. फक्त पाणी प्यावे.
स्क्रीनसमोर खाऊ नका
संगणकाच्या किंवा टेलिव्हिजनच्या स्क्रीनसमोर बसून खाल्ल्याने जास्त कॅलरीजचे सेवन केले जाते.
हेल्दी खा
कामाच्या ठिकाणी बदाम, एखादे सफरचंद यासारखे थोडे काही तरी खात चला. यामुळे तुम्हाला भरपूर भूक लागणार नाही.
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे