आरोग्यनामा ऑनलाईन- नवी दिल्ली : कंटोळी एक अशी भाजी आहे जी औषधी मानली जाते. यास ककोडा, केकरोल, काकरोल, भाट, कारले, कोरोला आणि करटोली, पडोरा अशा अनेक नावांनी ओळखले जाते. यात पौष्टिक तत्व भरपूर असतात. कंटोळीच्या सेवनाने लठ्ठपणा कमी होतो. तसेच कॅन्सर, डायबिटीज सारख्या धोकादायक आजारांपासून बचाव होतो.
हे आहेत फायदे
1 पुरूषांसाठी लाभदायक
जर तुम्ही शाकाहारी आहात तर कंटोळीची भाजी तुमच्यासाठी वरदान आहे. यात चिकनपेक्षा जास्त प्रोटीन आहेत. याच्या सेवनाने शारीरीक कमजोरी दूर होते आणि मजबूती येते. हेल्थ एक्सपर्ट म्हणतात, ही भाजी सेक्सशी संबंधीत समस्या दूर करते. लैंगिक जीवन सुधारते.
2 रक्तवाढीची मशीन आहे कंटोळी
कंटोळीच्या सेवनाने काही दिवसात शरीरात बदल दिसू लागतात. आतून मजबूती वाढते. यात चिकनपेक्षा 50 टक्के जास्त प्रोटीन आहेत. यातील प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स संपूर्ण दिवस एनर्जेटिक ठेवतात.
3 कॅन्सरपासून बचाव
कंटोळीची भाजी कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून वाचवते.
4 सर्दी-खोकला
अँटी-अलर्जन आणि एनाल्जेसिक यात असल्याने सर्दी, खोकला बरा होतो.
5 त्वचेसाठी गुणकारी
कंटोळीचे सेवन त्वचेसाठी लाभदायक मानले जाते. यात बीटा कॅरोटीन, अल्फा कॅरोटीन आणि जेक्सँथिन्स सारखे प्लेवोनाइड्स आढळतात, जे सर्व यौगिक आणि वाढत्या वयाची लक्षणे कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.