आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Health News | जांभुळ हे व्हिटॅमिन सी समृद्ध आहे म्हणून ज्यांना शरीरात व्हिटॅमिन-C ची कमतरता आहे, त्यांना जांभूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. जांभुळ अम्लीय फळ मानले जाते आणि हे चवीला गोड देखील असतात. यात ग्लूकोज आणि फ्रुक्टोज भरपूर प्रमाणात आहे. शरीराला आवश्यकता असलेले घटक जांभळामध्ये आढळतात. (Health News)
जांभूळ खाण्याचे फायदे
१) पोटाची समस्या दूर करण्यात फायदेशीर
जांभूळ सेवन केल्याने पोटाच्या समस्यापासून आराम मिळतो. आपण जांभळाच्या सालीचा काढा बनवून पिऊ शकतो. यामुळे पोटदुखी, अपचन यासारख्या समस्या दूर होतात.
२) रोगप्रतिकारशक्ती वाढते
जांभूळ हे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर आहे. त्यात पोटॅशियम, लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी असते. जांभळाचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते तसेच शरीरातील रक्ताची पातळी वाढते.
फाटलेल्या टाचा काही दिवसातच होतील ‘मुलायम’, वापरा हे DIY Foot Mask
३) यकृताच्या समस्येसाठी फायदेशीर
यकृताची समस्या कमी करण्यासाठी आपण जांभळाचे सेवन करू शकता. दररोज सकाळी आणि संध्याकाळी जांभळाचा रस घेतल्याने तुमची यकृताची समस्या कमी होऊ शकते.
सर्व ज्येष्ठांना व्हॅक्सीन दिल्यास देश मिळवू शकतो कोरोनापासून बचाव करण्याचे सुरक्षा कवच
४) संधिवातासाठी फायदेशीर
जर आपल्याला संधिवाताची वेदना होत असेल तर आपण जांभळाची साल उकळून घ्या आणि उर्वरित भाग वेदनेवर लावा.यामुळे वेदना कमी होते.
शॉम्पू केल्याच्या दुसर्याच दिवशी केस तेलकट होतात? ‘हे’ घरगुती उपाय येतील तुमच्या कामाला, जाणून घ्या
५) जखमांसाठी फायदेशीर
जर आपल्याला शूज घालताना आपल्या पायात फोड आले असल्यास आपण त्यावर जांभळाची बी बारीक करून आपण ती जखमेवर लावू शकता. यासाठी आपल्याला जांभळाची बी सुकवून बारीक करुन घ्यावी लागेल. यानंतर त्यात पाणी टाकून आपण ते वापरू शकता.
कोरोनातून बरे झाल्यावर ‘या’ गोष्टींचं चुकूनही करू नका सेवन, अन्यथा…
६) किडनीस्टोनच्या समस्येसाठी फायदेशीर
जर आपल्याला किडनीस्टोनची समस्या असेल तर जांभळाची बी वापरू शकता.आपण दही जांभळाच्या बियाची पावडर टाकून ते सेवन करू शकता.
केसांसाठी सर्वोत्कृष्ट कीवी हेअर मास्क, प्रत्येक समस्येपासून मुक्तता होईल; जाणून घ्या
या गोष्टीची काळजी घ्या….
जांभूळ कधीही रिकाम्या पोटी खाऊ नका. जर आपण जांभळाचे रिकाम्या पोटी सेवन केल्यास आपल्याला गॅसची समस्या उद्भवू शकते. तसेच जांभळाचे सेवन दुधासोबत देखील करू नये.
साखर खाण्या ऐवजी ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, गोड खाणं सोडल्याशिवाय मधूमेह अन् वजन वाढण्यापासून राहा दूर, जाणून घ्या
जांभूळ खाण्याची योग्य वेळ
आपण जेवण केल्यानंतर जांभळाचे सेवन करू शकता.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
तुम्ही जंगल जलेबी खाल्ली आहे का? आहेत ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या