आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भारत सध्या कोरोना व्हायरसने जास्त प्रभावित आहे. दुसर्या लाटेत कोरोना केवळ ज्येष्ठांनाच नव्हे, तर लहान मुलांसह सर्व वयोगटासाठी धोकादायक ठरत आहे. यासाठी आता 1 मे पासून 18+ लोकांनाही लस देण्यास सुरूवात झाली आहे. म्हणून व्हॅक्सीन घेण्यास टाळाटाळ करू नका. सोबतच व्हॅक्सीन घेण्यासाठी सेंटरवर जाण्यापूर्वी पुढील काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.
1. डबल मास्क घाला
सर्वच व्हॅक्सीन सेंटरवर प्रचंड गर्दी दिसून येत आहे. अशा गर्दीत एखादा संक्रमित व्यक्ती असल्यास संसर्ग वेगाने पसरू शकतो. यासाठी सेटरवर जाताना डबल मास्क घाला. एन-95 मास्क आत आणि कपड्याचा किंवा सर्जिकल मास्क बाहेरून घाला.
Coronavirus : घरात कोरोना रुग्ण असल्यास कोणती काळजी घ्यावी?, जाणून घ्या
2. ग्लोव्हज घाला
कोणत्या पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर आपला हात चेहरा, डोळे, नाक आणि तोंडावर जातो. ज्यामुळे व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. यासाठी ग्लोव्हज वापरा आणि चेहर्याला अजिबात स्पर्श करू नका.
Coronavirus : शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी होतेय? जाणून घ्या कधी येते हॉस्पीटलमध्ये जाण्याची वेळ
3. हात मिळवणे आणि गळाभेट टाळा
व्हॅक्सीन सेंटरवर कुणीही ओळखीचे भेटल्यास लांबूनच हाय-हॅलो करा. तसेच लाईनमधील लोकांशी बोलू नका.
मलेरिया तापामुळे यकृताचे नुकसान होऊ शकते; जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंध
4. सॅनिटायजरचा वापर करा
ग्लोव्हज घातल्यानंतर सुद्धा ग्लोव्हजवर सुद्धा सॅनिटायजर लावून हात स्वच्छ ठेवा, ज्यामुळे संसर्गाचा धोका राहणार नाही.
पुस्तक वाचल्याने केवळ आपले ज्ञान वाढणार नाही तर आरोग्यासही होतील आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या
5.मास्कला हात लावू नका
डॉक्टरांनुसार, अनेक लोक मास्कला वारंवार हात लावतात. असे करू नका कारण मास्कच्या बाहेरील पृष्ठभागावर व्हायरस असू शकतो.
उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी दररोज ‘हे’ आसन करा !
6. रिकाम्यापोटी व्हॅक्सीन घेऊ नका
व्हॅक्सीन घेण्यासाठी जाताना रिकाम्या पोटी जाऊ नका. चहा-कॉफी पिऊन किंवा काहीतरी हलके खाऊन मग निघा.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
शॉम्पू केल्याच्या दुसर्याच दिवशी केस तेलकट होतात? ‘हे’ घरगुती उपाय येतील तुमच्या कामाला, जाणून घ्या