आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोणतीही वाईट सवय ही वाइटच असते, असे आपण म्हणतो. मात्र, अशा काही सवयी असतात ज्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक ठरतात. वाईट सवयीविषयी सल्ले दिले जातात. पण त्या चुकीच्या का आहेत, याबाबत वैज्ञानिक पुरावे कुणालाच देता येत नाहीत. ढेकर देणे, थुंकणे, झोपण्याच्या ठिकाणी जेवण करणे अशा काही सवयींना वाईट मानले जाते, परंतु काही जाणकारांचे म्हणणे आहे की यामुळे आरोग्य चांगले राहते.
झोपण्याच्या ठिकाणावर जेवण करू नये असे मानले जाते, पण तज्ज्ञ सांगतात की, बेडवर भोजन करणे अनेकवेळा फायद्याचे ठरते. बेडवर जेवण केल्याने पॅरासिंपेथेटिक नर्वस सिस्टम सक्रिय राहते. तणाव जास्त असताना ही प्रणाली आणि पचन क्रिया बाधित होते अशावेळी बेडवर जेवण करणे फायद्याचे ठरते. आरामदायी वातावरणात जेवण केल्यास शरीरास मानवते. तसेच शारीरिक श्रम करताना किंवा वर्कआऊट करताना मध्येच थुंकल्यास श्वास घेताना त्रास होत नाही. थुकल्याने तोंडात आणि श्वासनलिकेत सलायवाची निर्मिती होते. नाकावाटे श्वास घेतल्यानंतर हवा आत येताच ती गरम होते. याच्यामुळे ऑक्सिजन शरीरात सर्वत्र पसरण्यात मदत होते. या प्रक्रियेवेळी श्वासनलिका कोरडी झालेली असते. थुंकल्यामुळे कोरड्या श्वास नलिकेत सलायवा तयार होतो. वेगाने श्वाशोछ्वास करताना पेशींना इफ्लेमेशनपासून वाचवण्यासाठी थुंकणे उपयोगी ठरते.
आहार नळीतून हवा वेगाने वर येत तोंडातून बाहेर पडते त्यावेळी आवाज येतो. अशावेळी व्हॉल्व्हमध्ये कंपन होते त्यास ढेकर किंवा बर्पिंग म्हणतात. सार्वजनिक स्थळी अशी ढेकर घेतल्यास किळसवाणे वाटते. परंतु ही प्रक्रिया पचन प्रक्रियेचा भाग आहे. म्हणून ही सवय पोटासाठी फायदेशीर आहे. ढेकर येण्याला थांबवल्यास हानिकारक गॅस पोटात राहतो. परिणामी छातीत जळजळ होते. काही लोक काम करताना अनेक वेळा चुटकी वाजवून बोलतात. ही सवय वाईट मानली जाते.
वडीलधारी माणसे या सवयीपासून लांब राहण्याचे सांगतात, पण ही सवय स्नायू आणि सांध्यांसाठी चांगला व्यायाम प्रकार आहे. सांध्यामध्ये सिनोविअल फ्लूड असते. चुटकी वाजवल्याने त्यावर दबाव पडतो आणि त्या द्रवात हवेचे बुडबुडे तयार होतात. त्यामुळेच आवाज निर्माण होतो. चुटकी वाजवल्याने सांध्यांना आराम मिळतो तसेच त्यांचा लवचीकपणा वाढतो. या सवयीमुळे बोटांच्या सांध्यांना कोणतीही इजा होत नाही, असा दावा काही तज्ज्ञ करतात.