आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत, ज्यास गुड आणि बॅड कोलेस्ट्रॉल म्हटले जाते. बॅड कोलेस्ट्रॉलचा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. हे ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्तप्रवाह कमी करते. यामुळे हार्ट अटॅक आणि हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढतो. तज्ज्ञांनुसार खराब दिनचर्या आणि अयोग्य खाणे-पिणे यासह जास्त वसायुक्त वस्तूंच्या सेवनाने शरीरात कोलेस्ट्रॉल वाढते. निरोगी व्यक्तीच्या शरीरात कोलेस्ट्रॉलची मात्रा 200 मिग्रॅ/डीएलपेक्षा कमी असावी. यासाठी खाण्या-पिण्यावर विेशेष लक्ष दिले पाहिजे. जर तुम्ही सुद्धा वाढत्या आणि बॅड कोलेस्ट्रॉलने त्रस्त असाल, तर आपल्या डाएटमध्ये या वस्तूंचा समावेश करा.
1. आवळ्याचे करा सेवन
अनेक संशोधनातून समजले आहे की आवळ्यात क्रोमियम आढळते, जे शरीरातील खराब किंवा वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करते. याशिवाय, आवळ्यात व्हिटॅमिन-सी आढळते, ज्यामुळे इम्यून सिस्टम सुद्धा मजबूत होते. याच्या सेवनाने मधुमेहाचा धोका कमी होतो. ह्रदय निरोगी ठेवण्यासाठी रोज आवळ्याचे सेवन आवश्यक करा.
2. कांद्याचे सेवन करा
यामध्ये अँटीऑक्सीडेंट, अँटी-इम्फ्लेमेटरी, अँटी-अॅलर्जिक आणि अँटी-कार्सिनोजेनिकचे गुण आढळतात, जे अनेक आजारात लाभदायक ठरते. सोबतच यामध्ये आयर्न, फोलेट पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, बी6, बी-कॉम्प्लेक्स सुद्धा आढळते. तर कांदा सल्फ्यूरिक कंपाऊंड्स आणि फ्लेवोनॉएड्सचा मुख्य स्त्रोत आहे. यासाठी कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यास सक्षम आहे.
3. खोबरेल तेलाचा वापर करा
शुद्ध खोबरेल तेल मेटाबॉलिज्मला गती प्रदान करते. यामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर पडते. इतर तेलांच्या तुलनेत शुद्ध खोबरेल तेल आरोग्यासाठी लाभदायक आहे. याच्या सेवनाने गुड कोलेस्ट्रॉल वाढते. यासाठी नियमित अंतराने आपल्या तेलात बदल करा. सोबतच वसायुक्त वस्तूंचे सेवन करणे टाळा.
4. व्हिटॅमिन-सीचे सेवन करा
कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी आपल्या डाएटमध्ये व्हिटॅमिन-सी युक्त फळे आणि भाज्यांचा समावेश करा. यामुळे मेटाबॉलिज्मची गती वाढते, बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतात.
स्टडी : ‘कोरोना’चा संसर्ग बनवू शकतो बहिरा, तुम्हाला तर ही समस्या नाही ना?
आजार : नेमकं कशामुळं फुफ्फुसे काळे पडतात ? जाणून घ्या त्याची कारणे, लक्षण आणि बचावाचे उपाय
किती धोकादायक आहे ब्लड कॅन्सर? ‘ही’ लक्षणं सुरूवातीला दिसल्यास तात्काळ व्हा सावध, जाणून घ्या