आरोग्यनामा ऑनलाईन टीम – दररोजच्या आहारातून जे वेगवेगळे अन्नघटक आपल्या पोटात जातात त्याद्वारे आपल्या शरीराचं पोषण होत असतं. मुख्यत्वे आपल्या जेवणात चपाती, पुरी, पराठा यांचा समावेश असतो. पण त्यापेक्षाही जास्त सकस आणि पोषक असलेल्या ज्वारीचा मात्र आहार म्हणून फार कमी वापर केला जातो. डायट प्लॅनमध्ये तर ती नावालासुद्धा नसते. म्हणूनच शहरी भागात ज्वारीची मागणी कमी झाली आहे. पण ग्रामीण भागात राहणारे लोकं आजही मुख्य अन्न म्हणून ज्वारीलाच प्राधान्य देतात. कदाचित त्यामुळेच शहरातल्या लोकांपेक्षा ग्रामीण भागातील्या लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी असतात. जाणून घेऊया ज्वारीची भाकरी खाण्याचे फायदे.
१) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.
२) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.
३) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.
४) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.
५) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.
६) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.
७) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.
८) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.