आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पावसाळा सुरु झाला की वातावरणात बदल होतो. पावसाळा आणि आजार यांचा जवळचा संबंध आहे. या दिवसात अनेकांचे डोळे चुरचुरतात. जाणून घ्या पावसाळ्यात डोळे का चुरचुरतात याविषयी
हवेतील दमटपणाही पावसाळ्यात वाढलेला असतो. हे वातावरण संसर्गजन्य रोगांसाठी पोषक असते. पावसाळ्यात नकळत आपल्या डोळ्यात काही सूक्ष्मजीव आपल्या डोळ्यात जातात. या सूक्ष्मजीवांना प्रतिरोध करण्यासाठी शरीर प्रत्युत्तर देतं. ज्यामध्ये शरीर एखाद्या ॲलर्जीची प्रतिक्रिया म्हणून हिस्टामाइन नावाचे रसायन सोडते. यामुळे डोळ्यातील रक्तवाहिन्या रुंदावतात आणि डोळे चुरचुरतात, खाजवतात, पाणी येते आणि कधी डोळे लाल होतात.
पावसाळ्यात डोळे चुरचुरण्यासह पापण्या सुजणे ,डोळ्यात पाणी येणे ,डोळ्यांची आग होणे, डोळे लाल होणे, डोळ्याच्या पृष्ठभागावर आणि त्याच्या पृष्ठभागावरील पडद्यावर सूज येणे यांसारख्या इतरही डोळ्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे पावसाळ्यात डोळ्याची विशेष काळजी घ्यावी.