आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सध्या भारतात कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेचा सामना लोक करत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी व्हॅक्सीन अभियान सर्वत्र सुरू आहे. मात्र अजूनही अनेक लोक व्हॅक्सीनच्या साईड-इफेक्ट्ला (Covid Vaccine Side Effects) घाबरत आहेत. तर मेडिकल एक्सपर्टचे म्हणणे आहे की, सामान्यपणे व्हॅक्सीनचे साईड-इफेक्ट्स (Covid Vaccine Side Effects) होतात, आणि हे सर्व आरोग्यासाठी वाईट नाहीत. हे साईड-इफेक्ट म्हणजे तुमची इम्यून सिस्टम व्हायरसशी लढण्यास तयार होत असल्याचा संकेत आहे.
तुम्ही जंगल जलेबी खाल्ली आहे का? आहेत ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या
हे आहे सामान्य साईड-इफेक्ट्स
ताप :
व्हॅक्सीन घेतल्यानंतर काही तासानंतर किंवा दुसर्या दिवशी ताप येऊ शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने यावर उपचार करू शकता. दुसर्या दिवशी हा ताप जातो.
हातात वेदना :
हातावर ज्या ठिकाणी इंजेक्शन घेतले आहे, तिथे वेदना होतात. काहीवेळा त्वचा लालसर होते. या वेदना आपोआप बंद होतात.
अंगदुखी :
मांसपेशी आणि सांध्यात कमी तीव्रतेचे दुखणे ही सामान्य प्रतिक्रिया आहे.
डोकेदुखी :
डोकेदुखीचा सुद्धा अर्थ हा आहे की, शरीर व्हायरसविरूद्ध तयार होत आहे.
थकवा :
व्हॅक्सीन शॉट घेतल्यानंतर थकवा सामान्य लक्षण आहे. याचा अर्थ शरीर व्हायरसपासून बचाव करत आहे.
या साईड-इफेक्टकडे दुर्लक्ष करू नका
– त्वचेवर रॅशेज म्हणजे चट्टे आले तर दुर्लक्ष करू नका. एक्सपर्टनुसार त्वचेवर चट्टे येणे किंवा लाल होणे व्हॅक्सीनचा सामान्य साईड-इफेक्ट आवश्य आहे, परंतु अनेकदा यास एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो.
– चट्टे त्या लोकांमध्ये सामान्य आहे, ज्यांना एखादी अॅलर्जी आहे, किंवा त्वचा नाजूक आहे. मात्र, चट्टे दिसताच ताबडतोब डॉक्टरांना दाखवा.
– याशिवाय सूज, ब्लिडिंग, बेशुद्धीत बोलणे किंवा बेशुद्ध होण्याकडे दुर्लक्ष करू नका ताबडतोब मेडिकल एक्सपर्टकडे संपर्क साधा.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
फुफ्फुसांना ‘निरोगी’ ठेवायचंय तर ‘ही’ 5 योगासने करा, कोरोनापासून होईल बचाव, जाणून घ्या
दररोज दह्यासोबत गुळाचं सेवन या वेळी करा, Immunity वाढण्यासह होतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या
Health News : जांभळाचे ‘या’ वेळी करावे सेवन, ‘हे’ 5 फायदे जाणून व्हाल हैराण