जन्मानंतर पहिले १० महिने बाळाच्या आहाराची ‘घ्या’ अशी काळजी

baby

आरोग्यनामा ऑनलाईन टीम- जन्मानंतर पहिले १ वर्ष बाळाचे जेवढे चांगले पोषण होईल तेवढे त्याच्या पुढील आयुष्यसाठी चांगले असते. त्यामुळे जन्मानंतर कमीत कमी १० महिने तुमच्या बाळाचे चांगले पोषण होणे गरजेचे असते. त्यासाठी बाळाला योग्य तो आहार द्यावा लागतो. तुमचे बाळ जर निरोगी आणि सुदृढ व्हावे असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या बाळाला खालील आहार द्या.

१) बाळाला जन्मानंतर पहिले ६ महिने फक्त आईच्या दूधाची गरज असते. वरच्या दूधाची अथवा पाण्याचीदेखील काही आवश्यकता नसते. त्यामुळे तुमच्या बाळाला कमीत कमी ६ महिने आईचे दूध पाजा.

२) जन्मानंतर अर्ध्या तासाच्या आत स्तनपानाला सुरुवात करावी. त्यामुळे बाळाला संपूर्ण आहार तर मिळतोच शिवाय त्याचबरोबर बाळाला रोगप्रतिकारशक्ती वर्धक पेशीदेखील मिळतात.

३) जन्माच्या पहिल्या ३-४ दिवसांत स्तनातून येणाऱ्या चिकामुळे बाळाचं संरक्षण होतं. बाळाच्या मेंदूची वाढ चांगली होते.

५) आपल्याकडे बाळाला दूध-बिस्किट देण्याची प्रथा आहे. दूध-बिस्किट दिसायला पेजेसारखं दिसत असलं, तरी शास्त्रीयदृष्ट्या ते हलक्या दर्जाचं अन्न आहे. त्याच्यामध्ये पुरेशी प्रथिनं तसंच खनिजं नसतात. फायबरचं प्रमाण कमी असल्यानं अशा मुलांना बद्धकोष्ठ होतो. त्यामुळे मुलांना चहा बिस्कीट देऊ नका.

६) सहा महिन्यानंतर बाळाला भाताचं व वरणाचं पाणी दिवसातून २-३ वेळा, ३-४ चमचे द्यावं. मुगाच्या डाळीची खिचडी, सूप, रवा, खीर, भाज्या, फळांचा गर, कोबी, फ्लॉवर, बटाटा इ. भाज्या खिचडीमध्ये शिजवून द्याव्यात.

७) पॅकेज फूड आणि फॉर्म्युला दूध टाळावं. गाई अथवा म्हशीचं दूध ९-१० महिने वयानंतर सुरू करावं.