आरोग्यनामा टीम : आरोग्य तज्ज्ञांनी अनेकदा इशारा दिला आहे की, ज्या लोकांचे वजन जास्त आहे किंवा लठ्ठपणाने ग्रस्त आहेत, त्यांना कोरोना व्हायरसचा धोका आणखी वाढतो. एवढेच नव्हे तर त्यांना मृत्यूचा धोकाही जास्त असतो. रिपोर्टनुसार, दिल्लीच्या इंद्रप्रस्था अपोलो हॉस्पिटलमध्ये आढळले की, कोरोना व्हायरसच्या 1000 रूग्णांपैकी 70 टक्के रूग्णजास्त वजन असणारे किंवा लठ्ठपणाने पीडित होते. लठ्ठपणा इतरही आजारांना निमंत्रण देतो. यामध्ये किडनी, हृदयरोग, टाईप-2 डायबिटीज़, फॅटी लीव्हर आणि अनेक प्रकारच्या कँसरचा समावेश आहे. जर तुमचे वजन जास्त असेल तर ते कमी करण्यासाठी तोबडतोब प्रयत्न करा. आम्ही येथे 5 टिप्स देत आहेत, ज्या फॉलो केल्यास वजन कमी होऊ शकते.
संतुलित आहार घ्या
पोषक आणि संतुलित आहर घ्या. ताजी फळे, भाज्या, धान्य, डाळी, सुकामेवा, मच्छी, मांस यासारख्या पदार्थांचा खाण्यात समावेश करा.
जास्तीत जास्त पाणी प्या
पाणी प्यायल्याने सुद्धा वजन आणि पोटाची चरबी घटते. रिसर्चमध्ये आढळले आहे की, जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्याने जेवण कमी जाते, ज्यामुळे वजन कमी होऊ शकते. यामुळे वजन कमी होण्याची शक्यता 44 टक्के वाढते. पाणी प्यायल्याने कॅलरी घटते, मेटाबॉलिज्म वाढते.
ग्रीन-टी प्या
दूधाच्या चहा पिण्याऐवजी ग्रीन-टी प्या. ग्रीन-टीमध्ये भरपूर अँटीऑक्सीडेंट्स असतात. ज्यामुळे वजन घटते.
कमी साखर
जास्त साखर सेवन करण्याचा थेट संबंध लठ्ठपणा, टाईप-2 डायबिटीज आणि हृदरोगाशी आहे. जर तुम्हाला वजन घटवायचे आहे, तर साखर खाण्याचे प्रमाण कमी करा.
वर्कआऊट करा
डाएटसह वर्कआऊट करणे आवश्यक आहे. दररोज एक्सरसाईज केल्याने शरीरात फॅट जमा होत नाही. यासाठी दिवसात कमीत कमी दिवसभरात अर्धातास जरूर व्यायाम करा. वॉक, डान्स, कार्डियो, जीने चढणे, असा कोणताही व्यायाम करा.
जीवनशैलीत आरोग्यदायी आणि सोपे बदल केल्यास तुमचे वजन कमी होईल, तसेच अनेक आजार दूर राहतील, विशेष म्हणजे सध्या कोरोनापासून तुम्ही सुरक्षित राहाल.