आरोग्यनामा ऑनलाइन टीम – एका नवीन रिसर्चनुसार, लठ्ठ लोकांमध्ये कोविड-19 ची लक्षणे जास्त दिसून येत आहेत. असे यासाठी कारण लठ्ठ लोकांमध्ये फॅटची मात्रा जास्त असते. ज्यामुळे लिव्हरवर वाईट परिणाम होतो. ज्यामुळे ऑक्सीजनची लेव्हल कमी होऊ लागते. याच कारणामुळे कोरोना होण्याची शक्यता वाढते. केवळ कोरोनाच नव्हे, लठ्ठ लोकांना अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता जास्त असते.
Neem Juice : जेवढं कडू तेवढंच फायदेशीर, आजारांना जवळ देखील येऊ नाही देत; जाणून घ्या
लठ्ठपणासह जर व्यक्ती डायबिटीजने पीडित असेल तर जास्त धोकादायक ठरू शकते. यासाठी डॉक्टर्सपासून फिटनेस एक्सपर्टपर्यंत अशावेळी वजन नियंत्रित करण्याचा सल्ला देतात. लठ्ठपणामुळे फिजिकल अॅक्टिव्हिटीज करण्यात अडचणी येतात. यामुळे कंबर, पाठ आणि गुडघ्यात सुद्धा वेदना सुरू होतात. तर हलक्या व्यायामानेच सुरूवात करा परंतु अॅक्टिव्हीटी बंद करू नका.
उन्हाळ्यात Back Acne मुळं परेशान असाल तर ‘हे’ घरगुती उपाय करा, डाग देखील होतील ‘क्लिअर’; जाणून घ्या
लठ्ठ व्यक्तींना स्लीप अॅपनिया, हायपर टेंशन, डायबिटीज सारखे आजार जास्त होतात. जे कोरोनाशी लढ्यात शरीराला साथ देऊ शकत नाहीत. जर तुमचे सुद्धा वजन खुप जास्त असेल तर ते वेळीच नियंत्रित करा. वर्कआऊटशिवाय योग्य डाएट आणि लाईफस्टाईलने मोठ्या प्रमाणात वजन नियंत्रित करता येऊ शकते.
असा नियंत्रित करा लठ्ठपणा
1- फायबर युक्त पदार्थांचा डाबटमध्ये समावेश करा.
2- प्रोटीनयुक्त पदार्थ जास्त वेळ पोट भरलेले ठेवतात, त्यांचाही समावेश करा.
3- हिरव्या पालेभाज्या आणि फळांचे सेवन करा. फ्रुट्समध्ये कॅलरीची मात्र एकदम कमी असते.
4- सकाळी किंवा सायंकाळी व्यायाम करा.
5- काही काळासाठी साखर, तांदूळ पूर्णपणे डाएटमधून दूर करा. वजन नियंत्रित झाल्यानंतर पुन्हा कमी प्रमाणात सेवन करू शकता.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
दात किडले असतील तर अवलंबा ‘हे’ 6 नैसर्गिक उपाय, वेदनांपासून मिळेल ताबडतोब आराम
उन्हाळ्यात वाढतो फुड पॉयजनिंगचा धोका, बचावासाठी जेवण बनवताना ‘या’ गोष्टींकडे ठेवा लक्ष, जाणून घ्या