आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आरोग्य चांगले राहण्यासाठी अनेक लोक पायी चालण्यासाठी जातात. परंतु, अतिशय सावकाश चालण्याने शरीराला फारसा फायद होत नाही. तसेच आठवड्यातून एखाद दिवशी किंवा एक दिवसाआड चालण्याने फारसा उपयोग होत नाही. म्हणून व्यायामाचे तज्ज्ञ ब्रिस्कवॉकचा सल्ला देतात. याची माहिती आपण घेणार आहोत.
ब्रिस्कवॉक म्हणजे काय ?
ब्रिस्कवॉक हा वेगवान चालण्याचाच एक भाग आहे. जॉगिंग आणि चालणे याचा हा मध्य आहे. ब्रिस्कवॉकमध्ये साधारणत: १२ मिनिटांमध्ये एक किलोमीटर अशा गतीने चालणे अपेक्षित असते.
हे लक्षात ठेवा
१) चांगले शूज वापरा.
२) शरीर आणि पाठ ताठ असू द्या. पोक काढून चालू नका.
३) नजरही थेट डोळ्यांच्या रेषेत ठेवा.
४) हात सुद्धा हलले पाहिजेत.
५) सुरुवातीला आणि थांबताना काही मिनिटांमध्ये संथ गतीने चाला.