आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अळूची पाने ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आळूची पाने खाल्याने आपण अनेक आजारांवर नियंत्रण मिळवू शकता. त्यामुळे तुम्ही आहारात अळूच्या पानाचा उपयोग करा. कारण यामुळे तुमचे अनेक आजार बरे होण्यास मदत होईल. आणि आरोग्य ही चांगले राहील.
अळूची पाने खाण्याचे फायदे :
१) नुकतीच प्रसूती झालेल्या महिलेला दूध कमी येत असल्यास तिने अळूच्या पानांची भाजी खावी.
२) अळूची पाने खाल्याने शरीरातील रक्त वाढवण्यास मदत होते. त्यामुळे ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे. त्यांनी अळूच्या पानाचे सेवन करावे.
३) आजरी व्यक्तीला ताप आला तर त्याच्या जीभेची चव जाते. त्यामुळे कोणतंच त्याला कोणत्याच अन्नाची चव लागत नाही. आजरी व्यक्तीला जर पण अळूची पाने तळून दिली. तर त्याच्या जिभेला चव येते.
४) अळूची पाने ही थंड असल्याने ते वात, पित्त, कफ नाशक असतात. त्यामुळे ज्यांना या समस्या आहेत. त्यांनी अळूची पाने खावीत.
५) अशक्तपणा दूर करण्यासाठी अळूची पाने ही प्रभावकारी ठरतात.