‘जांभूळ’ आरोग्यसाठी फायदेशीर
आरोग्यानामा ऑनलाइन टीम – असे म्हंटले जाते की ज्या त्या सीझनमध्ये येणारी फळे हे आरोग्यवर्धक असतात. सध्या उन्हाळ्याचा सिझन सुरु आहे. उन्हाळ्यात आंबा हा प्रामुख्याने खाल्ला जातो. मात्र रानमेवा म्हणून ओळखले जाणारे करवंद, जांभूळ ही फळं देखील आरोग्यदायी असतात. सुंदर जांभळ्या रंगाचे जांभूळ हे फळ आरोग्याकरिता गुणकारी असते. चला जाणून घेऊया जांभूळ खाल्ल्याने काय फायदे होतात.
१) उष्णता दूर करते
जांभूळ हे फळ थंड असल्यामुळे उष्णता दूर करते. तसेच पचनशक्तीच्या समस्यांवर देखेल जांभूळ प्रभावी आहे. जांभळात व्हिटॅमिन सी भरपूर असतं त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि ऋतुमानानुसार बळावणारे आजार दूर राहतात.
२) रक्तशुद्धीकरिता गुणकारी
जांभळामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे रक्ताला ऑक्सिजनपुरवठा होऊ रक्त शुद्ध राहण्यात मदत होते.
३)त्वचा विकारावर गुणकारी
जांभळातील अस्ट्रिन्जेंट घटक ऑईली स्किन फ्रेश, मुलायम ठेवते, पुरळची समस्याही दूर होते.
४) हृदयरोगावर गुणकारी
जांभळामध्ये पोटॅशिअम असतं, ज्यामुळे हृदय निरोगी राहतं. हायपरटेंशन, स्ट्रोक, हृदय रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांचा धोका टळतो.