आरोग्यनामा ऑनसलाइन टीम – लालभडक, गोड आणि पाणीदार कलिंगड अनेकांना आवडते. कलिंगडाचा सरबत तर लाजवाबच! आपल्याकडे विशेषता दोन प्रकारची कलिंगडे बाजारात दिसतात. एक बाहेरून गडद हिरव्या काळपट रंगाचे असते तर एक पांढरे आणि हिरवे पट्टे असलेले असते. दोन्हीही रसदार आणि गोड असतात. परंतु, अलिकडे फळे खाताना खुप काळजी घ्यावी लागते. फळे खाताना कोणती काळजी घ्यावी, यातील भेसळीचे होणारे दुष्परिणाम कोणते हे आपण जाणून घेणार आहोत.
हे लक्षात ठेवा
१. काही फळे कॅल्शियम कार्बाईड वापरून पिकवली जातात. ही फळे चवीला चांगली लागत असली तरी रसाळ नसतात.
२. कलिंगडाला तर लालभडक रंग येण्यासाठी लेड क्रोमेट नावाच्या द्रव्याचे इंजेक्शन दिले जाते.
३. लेड क्रोमेट इंजेक्शन दिलेले कलिंगड सतत खाण्यात आल्यास अॅनिमिया होऊ शकतो, स्मृती कमी होऊ शकते. तसेच डोळांना इजा होते.
४. फळे पिकवताना कार्बाईड वापरल्याने किडनी आणि लिव्हरला इजा होऊ शकते.
कलिंगड खाण्याचे हे फायदे
१. कलिंगडाच्या पांढऱ्या सालीलगतच्या भागात सिट्रुलिन नावाचे द्रव्य मुबलक असते. ते शरीरात गेल्यास त्यातून आरजिनीन आणि नायट्रेस ऑक्साईड बनते. ज्यामुळे हृदयाचे आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते.
२. शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते.
३. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.
४. पचनक्रिया सुधारते.