आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीर कमजोर झाल्यास विविध आजार होतात. अशावेळी आयुर्वेदिक पद्धतीने आरोग्याची काळजी घ्यावी. त्रिफळा ही औषधी शरीराचा कायाकल्प करू शकते. त्रिफळाचे नियमित सेवन केल्याने अनेक फायदे होतात. त्रिफळामुळे बद्धकोष्ठतेसह कमजोर शरीराला उर्जा सुद्धा मिळते. त्रिफळाचे अनेक उपाय आहेत. हिरडा, बेहडा, आवळा यांच्या मिश्रणापासून त्रिफळा चूर्ण तयार केले जाते. आयुर्वेदिक डॉक्टर या औषधाचा सर्वाधिक वापर करतात. चरक संहितेच्या सर्वात पहिल्या अध्यायात त्रिफळाचा उल्लेख आहे. याच त्रिफळा चुर्णाचे खास फायदे आपण जाणून घेणार आहोत.
सेवन करण्याची पद्धत
शारीरिक स्वास्थ्यासाठी त्रिफळा चूर्ण दैनंदिन जीवनात नित्य वापरता येते. रात्री झोपतांना एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. प्रकृती, वयानुसार या प्रमाणात बदल करावा.
कृमीची समस्या
त्रिफळा चुर्णाचे सेवन केल्याने पोटातील कृमीची समस्या नष्ट होते. शरीरामध्ये रिंगवॉर्म किंवा टेपवॉर्म झाल्यास त्रिफळा रामबाण उपाय आहे. त्रिफळा, शरीरातील रक्त कोशिका वाढवते, ज्यामुळे इन्फेक्शनशी लढण्याची क्षमता वाढते.
श्वसन समस्या
श्वसनाशी संबधित आजारांमध्ये त्रिफळा लाभदायक असून याचे सेवन केल्याने श्वास घेण्यात येणारी अडचणी दूर होते.
कॅन्सर
त्रिफळा औषधीने कॅन्सरवर उपचार शक्य असल्याचे एका संशोधनात आढळून आले आहे. यामध्ये अँटी-कॅन्सर तत्त्व आढळून आले आहे. त्रिफळाच्या सेवनाने शरीरातील कॅन्सर कोशिकांच्या विकासाला कमी केले जाऊ शकते.
डायबिटीज
डायबिटीजवर त्रिफळा अत्यंत उपयुक्त असून हे पेनक्रीयाजला उत्तेजित करते. यामुळे इन्सुलिन निर्माण होते. शरीरात इन्सुलिनची योग्य मात्रा साखरेचा स्तर कायम ठेवण्यात मदत करते.
डोकेदुखी
डोकेदुखीची समस्या त्रिफळाचे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नियमित सेवन करावे. त्रिफळा डोकेदुखी कमी करते. डोकेदुखी विशेषतः मेटाबॉलिक गडबडीमुळे होते.
अॅनिमिया
रक्ताची कमतरता असल्यास अॅनिमिया रोगाची उत्पत्ती होते. या रोगामध्ये शरीर पिवळे पडते. रुग्णाला चक्कर येते. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे असे घडते. अशावेळी त्रिफळाचे सेवन करावे. यामुळे शरीरातील ब्लड सेल्स वाढतात आणि अॅनिमिया दूर होतो.
पचनक्रिया
पाचन समस्या दूर करण्यासाठी त्रिफळा रामबाण उपाय आहे. आतड्यांशी संबंधित समस्या त्रिफळा चूर्णाचे सेवन केल्याने दूर होऊ शकतात. पित्तामुळे अपचनाची समस्या निर्माण होते.
वजन कमी करणे
ज्या लोकांना कमी वयातच लठ्ठपणाचा त्रास जाणवत असेल त्यांच्यासाठी त्रिफळा खूप उपयोगी आहे. याचे नियमित सेवन केल्यास फॅट कमी होते.
त्वचेची समस्या
कोणत्याही प्रकराची स्किन समस्या निर्माण झाल्यास त्रिफळा उपयुक्त ठरते. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढते आणि रक्त शुद्ध बनवते.
तारूण्यासाठी
त्रिफळा चुर्णामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट असतात, जे सेल्सच्या मेटाबॉलिझमला नियमित ठेवतात. तसेच त्यांची प्रक्रिया कायम ठेवतात. त्रिफळाने वय वाढवणारे घटक कमी होतात, यामुळे याच्या सेवनाने वय कमी दिसते.
रोगप्रतिकारक क्षमता
यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. त्रिफळा, शरीरातील अँटीबॉडीचे उत्पादन वाढवते, जे शरीरातील किटाणूंशी लढते आणि बॉडीला बॅक्टीरिया मुक्त ठेवते.