‘पौष्टिक’ रताळे आरोग्यासाठी वरदान, होतात ‘हे’ ५ फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – प्रामुख्याने रताळं हे कंदमूळ बहुतांशी उपवासाच्या दिवसात खाल्ले जाते. १०० ग्रॅम  रताळ्यामध्ये ४०० टक्क्यांपेक्षाही  जास्त व्हिटॅमिन ए असते.

भूकेवर नियंत्रण राहते
रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते . फायबरमुळे रताळं खाल्ल्यानंतर खूप वेळ पोट भरलेले राहते तसेच भूकेवरही नियंत्रण मिळवता येते. उपवासाच्या दिवसाव्यक्तिरिक्त ऐरवी रताळ्याचा आहारात समावेश करा.


रातांधळेपणा
रताळ्याच्या सेवनाने  रातांधळेपणा कमी होतो.

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते
रताळ्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे रक्तातील साखरेची आणि त्यासोबतच रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते
रताळ्यामध्ये व्हिटामिन ए मुबलक आढळते. त्यामुळे  रोगप्रतिकारशक्ती वाढते.

हाडे मजबूत होतील
रताळ्याच्या सेवनाने हाडांना बळकटी मिळते.