‘ओले सॉक्स’ घालून झोपल्याने दूर होईल ताप, वाचा चकित करणारे फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ओले सॉक्स घालून झोपल्याने काही आजार बरे होतात. हे ऐकण्यात थोडेसे विचित्र वाटत असले तरी खरे आहे. ताप, कफ आदी आजारावर हा फायदेशीर उपाय आहे. जर तुम्हाला सर्दी, खोकला, ताप पोटासंबंधीत काही समस्या असल्यास काही घरगुती उपाय केल्यास चांगला फरक दिसून येतो. विषेश म्हणजे या घरगुती उपायांनी कोणत्याही प्रकारचा साइड इफेक्ट होत नाही. सॉक्सच्या अशाच आश्चर्यकारक उपायांची आपण माहिती घेणार आहोत.

कफ बाहेर पडतो
ओले सॉक्स घालून झोपल्याने कफदेखील लवकर बाहेर पडतो. एका बाउलमध्ये २ कप दूध, एक चमचा मध आणि २ कांद्याचे तुकडे कापून बाउलमध्ये टाका. हे १५ मिनीट बाऊलमध्ये ठेवा. १५ मिनिटानंतर एक जोडी सॉक्स या मिश्रणात भीजवा आणि अतिरिक्त पाणी काढून पायात घाला. रात्रभर हे पायात घालून झोपा. कांदा आणि दूधाच्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इंफ्लेमेंटरी गुणांमुळे कफ हल्का होतो आणि सहज बाहेर पडतो.

पचन समस्या
काळे जीरे, बडीसोप पाण्यात टाकून १५ मिनिटे उकळावे. नंतर सॉक्स यामध्ये भीजवून याचे अतिरिक्त पाणी काढून घालून घ्यावे. या घरगुती उपायाने पचनाची समस्या अध्र्या तासात दूर होईल. जीरा आणि बडीसोप रक्त प्रवाहाला दुरुस्त करते आणि पोटासंबंधीत समस्या दूर होतात.

बध्दकोष्ठता
बध्दकोष्ठतेचा त्रास असल्यास अर्धा पीस बटर, अर्धा सफरचंद, एक चमचा मध आणि एक चमचा जवस घ्या. हे एक कप बाउलमध्ये घेऊन मिश्रण करुन घ्या. सॉक्स या मिश्रणात टाकून ते पिळून घ्या. रात्रभर घालून झोपा, सकाळी तुमचे पोट स्वच्छ होईल.

ताप उतरतो
खुप ताप आला असेल तर एका बाउलमध्ये २ ग्लास पाणी घ्या आणि त्यामध्ये एक चमचा व्हिनेगर टाका. त्यामध्ये एक जोडी वूलनचे सॉक्स भिजवून ते चांगल्याप्रकारे पिळून पायात घाला. रात्रभर हे सॉक्स घालून झोपा. ४० मिनीटांच्या आत तुमचे तापमान कमी होईल. तसेच इम्यूनिटी सिस्टम देखील मजबूत होते.