आरोग्यनामा ऑनलाईन टीम : चांगल्या आरोग्यासाठी फळांचे सेवन करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ नेहमी देतात. त्यातूनही आजारांनुसार फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. चिकू हे फळ सुद्धा आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. तसेच चिकुमुळे दिर्घायुष्य लाभत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. यात क जीवनसत्त्व असल्याने अनेक आजार दूर राहतात.
हे आहेत फायदे
चिकू सालीसकट खा. याच्या सालात खूप आरोग्यकारी गुणधर्म आहेत.
चिकू रक्तवर्धक आहे. यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघेल.
हृदयविकार दूर ठेवायचे असतील तर रोज किमान एक तरी चिकू खा.
मधुमेहाची समस्या असल्यास चिकुच्या सेवनाने ती नियंत्रणात राहू शकते.
याच्या नियमित सेवनाने थकवा दूर होतो.
Visit : bahujannama.com