आरोग्यनामा ऑनलाइन टीम – नाचणी हे धान्य आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. यामध्ये चांगल्या प्रतीचे पोषक तंतुमय भाग असतात. यामुळे बद्धकोष्ठता होत नाही. तसेच रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होऊन पचनक्रियेवेळी ग्लुकोज, शर्करा हळूहळू रक्त प्रवाहात मिसळली जाते. नियमित नाचणी सेवन केल्यास हृदयरोग, आतड्यावरील व्रण आणि मधुमेहाचे प्रमाण कमी होते. नाचणीचे शेक नियमित घेतल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
असे बनावा नाचणी शेक
साहित्य
* ४ चमचे नाचणी
* अर्धा लिटर दूध
* सुकामेवा आवश्यकतेनुसार
* ३ चमचे साखर
* सजावटीसाठी एक फळ
* ४ विलायची
तापत ठेवलेल्या कढईमध्ये तेल टाकून नाचणी चांगली भाजून घ्या. दुसरीकडे एका भांड्यात दूध उकळून घ्या. त्यानंतर दुधात सुकामेवा टाकून उकळून घ्या. दुधाला उकळी आल्यानंतर साखर टाका. नाचणीमध्ये चार चमचे थंड पाणी टाका. त्यानंतर हळूहळू चमच्याने नाचणी टाकत रहा. थंड झाल्यानंतर फळांनी सजवून घ्या.
हे होतील फायदे
१ नाचणी मधुमेह रुग्णांसाठी लाभदायी आहे. शरीरात ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
२ शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाणही वाढते.
३ भूक वाढवण्यासही मदत करते.
४ नाचणी शेकचे रोज अर्धा ग्लास सेवन केल्याने दिवसभर उर्जा मिळते.
५ यातील कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात.