आरोग्यनामा ऑनलाईन टीम – घर, ऑफिस, मुलं, स्वयंपाक अशा अनेक जबाबदारी एकाच वेळी महिला पार पाडत असतात. ही कसरत करत असताना त्यांचे आहाराकडे दुर्लक्ष होते. मात्र, यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येते. महिलांच्या आरोग्यासाठी प्रोटीन्स खुप आवश्यक असतात. महिलांनी प्रोटीनयुक्त आहार घेतल्याने कोणता फायदा होतो. तसेच कोणत्या पदार्थांमधून भरपूर प्रोटीन मिळतात, आणि प्रोटीनच्या कमतरतेची लक्षणे याची माहिती घेवूयात.
प्रोटीनच्या कमतरतेचे संकेत
* वारंवार चिडचिड होणे.
* वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे.
* इम्यूनिटी कमी होणे.
* कमजोरी जाणवणे.
* मेमरी कमी होणे.
हे पदार्थ खा
१) अंडी, दही, बिन्स
भूक कमी लागते, वजन नियंत्रणात राहते.
२) चनाडाळ, तिळ, शेंगदाणे
रक्ताभिसरण चांगले होते. हृदय निरोगी राहते.
३) सोयाबिन, चिज, मासे
केसगळती थांबते. केस लांब आणि दाट होतात.
४) डाळ, पालक, दही
हाडे मजबूत होतात. सांधेदुखी होत नाही.
५) पालक, टोफू, दूध
मेंदू क्रियाशिल होतो. स्मरणशक्ती वाढते.
६) हरभरे, मुगाची डाळ
त्वचा निरोगी होते. सुरकुत्या जातात.
७) बदाम, अंडी, सी फूड
मांसपेशी मजबूत होतात.
८) काबुली चना, डाळ, पनीर
रक्तातील साखर नियंत्रित होते. मधुमेह होत नाही.
९) मुगाची डाळ, भोपळ्याच्या बिया, राजमा
मूड चांगला राहतो. राग कमी होतो.
१०) ओट्स, राजमा, नट्स
उर्जा वाढते, कमजोरी दूर होते.