पनीर खाल्ले तर दात होतील चमकदार, वजन वाढेल

July 6, 2019

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भारतीय पदार्थांमध्ये पनीरचा वापर स्वाद आणि आरोग्यासाठी केला जातो. अनेक प्रकारचे चीज बाजार उपलब्ध आहेत, परंतु पनीर म्हणजेच कॉटेज चीज सर्वांपेक्षा वेगळे असते. शरीराला सर्व आवश्यक पोषक द्रव्ये दुधामध्ये असतात. मात्र, दूध आवडत नसेल तर पनीरपेक्षा उत्तम दुसरे काहीच असू शकत नाही. पनीरमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते.

पनीचे नियमित सेवन केल्यास दात आणि हाडे मजबूत राहतात. यामध्ये लॅक्टोज खूप कमी प्रमाणात असते. त्यामुळे दातांना गोड पदार्थांपासून होणारा धोकाही राहत नाही. पनीरचे नियमित सेवन केल्याने रक्त वाढते, लिव्हर मजबूत राहते आणि व्यक्तीला पोषक द्रव्ये शोषून घेण्याची ताकद मिळते. पनीर इन्सुलीन रेझिस्टंस सिंड्रोम विकसित होऊ देत नाही. वाढत्या वयासोबत येणाऱ्या समस्यांपासून बचाव करण्यात पनीरची महत्त्वाची भूमिका आहे. नीरच्या नियमित सेवनाने पाठ आणि सांध्यांशी संबंधित त्रास होत नाही.

कॅल्शियमव्यतिरिक्त पनीरमध्ये मोठय़ा प्रमाणात ड जीवनसत्त्व असते. हे दातांच्या मुळापर्यंत घर करणाऱ्या जंतुंची किंवा कॅव्हिटिजची सुटका करण्यास सक्षम आहे. याचे नियमित सेवन केल्याने आपल्या दातांचे आरोग्य चांगले राहते. ज्यांचे वजन कमी आहे त्यांनी पनीरचे सेवन केले पाहिजे. यामध्ये असलेली प्रथिने, फॅट आणि मिनरल वजन वाढवण्यास मदत करतात. तसेच प्रथिने व्यक्तीला कर्करोगाच्या धोक्यांपासूनही दूर ठेवतात.